जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेचे गटनेते स्वप्निल सुरेशराव शिंदे यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या युवक तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
जत तालुक्यातील प्रभावी नेते असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांचे स्वप्निल चिरंजिव आहेत.शिंदे यांच्या दुसऱ्या पिठीचे सध्या स्वप्निल हे नेतृत्व करत आहेत.तालुक्यातील काही मोजक्या नेत्यापैंकी सुरेशराव शिंदे हे धुरंधर राजकारणी म्हणून परिचित आहेत.जत शहर,शेगाव,येळवी,कुंभारी,डफळापूर,पाच्छापूर,परिसरात त्यांचा मोठा प्रभाव आहे.तालुक्यातील प्रभावशाली नेत्यापैंकी ते एक आहेत.गत नगरपरिषद निवडणूकी पुर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसची धुरा खांद्यावर घेतली आहे.
त्यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून ताकत मिळाली आहेत.त्यांचे चिरजिंव व नगरपरिषेदेत अल्पावधीत प्रभावी काम करत असलेले स्वप्निल शिंदे यांना युवक तालुकाध्यक्ष पद देत पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तालुक्यात युवकांचे मजबूत संघटन करून राष्ट्रवादी कॉग्रेसचे विचार तळागाळापर्यत पोहचवून पक्ष वाढविण्यासाठी त्यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे.नगरपरिषदेत त्यांनी दाखविलेली चुणूक आता तालुक्यातील प्रभावशाली युवक नेते म्हणून ते पुढे येतील ऐवढे निश्चित..
तालुक्यात युवकांचे संघटन मजबूत करणार
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व तालुक्यातील नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवकांचे संघटन मजबूत करून पक्षाला गतवैभव आणण्यासाठी यापुढे माझा प्रयत्न राहिल.
स्वप्निल शिंदे
तालुकाध्यक्ष,
युवक राष्ट्रवादी कॉग्रेस,जत