चोरीच्या गुन्ह्यातील 32 तोळे सोने,रोख रक्कम फिर्यादीस परत
शिराळा : मांगले (ता.शिराळा) येथील डॉक्टर बाबासो निवृत्ती पाटील (वय 59)यांच्या मांगले येथील राहत्या घरातून 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान सोन्या चांदीचे दागिने,रोख रक्कम 32 हजार,देवाची भांडी,असे साहित्य चोरीस गेले होते.पोलीस निक्षक विशाल पाटील व सहकार्यांनी या चोरीचा चोवीस तासात छडा लावला होता.

या गुन्ह्यातील संशयित राहुल उत्तम देवकर व रोहित उत्तम देवकर दोघेही राहणार मांगले यांचेकडून घरफोडी गुन्ह्यातील 32 तोळे सोने व रोख 32 हजार रुपये,अशी रक्कम हस्तगत केली होती सदरचा मुद्धेमाल व रोख रक्कम आज उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे पोलीस निरीक्षक विशाल पाटील व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबसो पाटील यांना परत देण्यात आली.
शिराळा येथील चोरीच्या गुन्ह्यातील 32 तोळे सोने,रोख रक्कम फिर्यादीस परत देण्यात आली.