शिराळा,प्रतिनिधी : बेकायदा सुंगधी सुपारी व गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडत कुरळप पोलीसांनी तेवीस लाख रुपयांची सुगंधी सुपारी व गुटखाजन्य पदार्थ जप्त केले.
पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्ह्यात रात्रीचे संचारबंदीच्या नियमांचे पालन करण्याकरीता व वाहतुक नियमन करुन संशयीत वाहनांची तपासणी करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत.
त्यानुसार ता.24 डिसेंबर ला रात्री साडेदहाच्या सुमारास माहामार्ग क्र.4 वरील येलुर फाटा येथे
येथे संचारबंदीच्या नियमांचे पालन व संशयीत वाहन तपासणीचे काम चालू होते.त्यावेळी कोल्हापूर बाजूकडुन एक बाराचाकी टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच 21 बीएच 7774)येत असल्याचा दिसल्याने त्यास तपासणीकामी बाजूला घेतले,असता सदर ट्रकभोवती सुगंधी सुपारीचा वास आल्याने पो ना अनिल पाटील यांनी सदर ट्रकमधील भरलेल्या मालाविषयी ट्रकवरील चालकाकडे विचारणा केली.व माल पाहीला असता तो सुगंधी सुपारी (गुटखाजन्य पदार्थ) असल्याचा संशय आल्याने,सदरच्या ट्रकमधील माल हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत माल आहे का ?
याबाबत खात्री करणेसाठी मालासह ट्रक ताब्यात घेवून पोलीस ठाणेत आवारात आणून लावून ट्रकमधील गुटखाजन्य पदार्थाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 23,72,700/- (तेवीस लाख, बात्तर हजार, सातशे) रुपयांची सुगंधी सुपारी व गुटखाजन्य पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
सदरच्या मालावर महाराष्ट्र राज्यात बंदी असल्याने प्रतिबंधीत मुद्देमाल व वाहन मिळून सुमारे 43,72,700/- रुपयांचा मुद्देमाल पुढील कारवाई कामी जप्त करणेत आला. पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मदतीने चालू आहे.स.पो.नि.अरविंद काटे कुरळप,अनिता मेनकर,बाजीराव भोसले,आंनदा चव्हाण,अनिल पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.
कुरळपमध्ये 23 लाखाचा गुटख्यासह जप्त केलेला ट्रक