सांगली : राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 11 डिसेंबर रोजीच्या पत्रान्वये सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 23 ते 30 डिसेंबर 2020 (दि. 25, 26 व 27 डिसेंबर 2020 सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 16 सप्टेंबर 2017 पत्रान्वये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जिल्ह्यातील सहकारी तसेच अनुसूचित बँका मध्ये निवडणुकीकरिता स्वतंत्र खाते उघडण्याची मुभा देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
सदर निवडणुकीमध्ये नामनिर्देशन दाखल करू इच्छित असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेसह, अनुसूचीत बँका व जिल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या शाखेतही बचत खाते निवडणूक विषयक खर्चाच्या व्यवहारासाठी काढता येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.