जि.प.शाळा क्र 2 जतमधील शिक्षकांच्या बदल्या करा | पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन
जत,प्रतिनिधी : जत येथील जि.प.मराठी शाळा नं.2 मधील शिक्षकांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी पालकांच्या वतीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. तसे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि,जत शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा क्रं.2 या शाळेतील शिक्षकांबद्दल पालक,विद्यार्थ्यांची मोठ्या तक्रारी आहेत.शाळेत असणारे 2 शिक्षक सातत्याने गैरहजर असतात.चालू शैक्षणिक वर्षामध्ये त्यांची उपस्थिती शून्य आहे.विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात नाही.त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे येथील शिक्षकांची इतत्र बदली करावी,असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर मिनाक्षी अक्की,सुवर्णा अलगूर,बसवराज अलगूर,जयंत भोसले,सौराणी मठपती,भारती अलगूर,महादेवी स्वामी,हेमलता निकम यांच्या सह्या आहेत.

जत येथील जि.प.शाळा 2 मधील शिक्षक बदलावेत या मागणीचे निवेदन देण्यात आले.