आंतरराज्य दरोडा व घरफोडी करणारी टोळी जेरंबद

0
2



सांगली : जिल्ह्यात आंतरराज्य दरोडा व घरफोडी करणारी टोळी जेरंबद करण्यात पोलीसांना यश आले आहे.याप्रकरणी केराम ऊर्फ कैरमसिंग रमेश मेहडा,(वय 30,उदयसिंग रेमसिंग मेहडा,गुड्या ऊर्फ गुडीया ठाकुर मेहडा,(वय 20,सर्वजण रा. काकडवाल ता. कुक्षी जिल्हा धार (मध्यप्रदेश) व त्यापैंकी एक विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेतले आहे.









पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम,

उपविभागीय पोलीस अधिकारी‌अजित टिके, नित्यानंद झा,परीविक्षाधिन आयपीएस, यांनी घरफोडी जबरी चोरी, या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करत त्यांनी केलेले गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घरफोडी जबरी चोरी, या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी पकडून, गुन्हे उघड करणेकामी एक खास पथक तयार केले आहे.









दिनांक 24 डिसेंबर‌रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व पोलीस स्टाफ असे एक पथक सांगली,कुपवाड ,मिरज शहर मनपा परिसरात होत असलेल्या चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालणेच्या‌अनुशंगाने सरकारी वाहन व खाजगी वाहनानी संजयनगर, माधवनगर, कुपवाड परीसरातून पेट्रोलिंग करीत कुपवाड सोसायटी चौकाशेजारील यल्लामा मंदीर जवळ,सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कुपवाड ते बुधगाव कडे जाणारे रोडवरील अष्टविनायक नगर मधील शिवशंकर मल्टीपर्पज हॉल जवळील झाडाखाली 5 लोक संशयित पणे बसून हिंदी भाषेत बोलत थांबले आहेत.









त्यानुसार तपास करत असताना एका पडक्या घराजवळ हे संशयित झाडाखाली 5 इसम थांबलेले दिसले, मिळाले बातमीतील वर्णनाप्रमाणे संशय आल्याने त्यापैंकी 4 इसमांना पकडले व त्यातील 1 जण शेजारीच असले ऊसाचे शेतातुन पळुन गेला. केराम ऊर्फ

कैरमसिंग रमेश मेहडा, उदयसिंग

रेमसिंग मेहडा, गुड्या ऊर्फ गुडीया

ठाकुर मेहडा सर्वजण रा.काकडवाल ता. कुक्षी जिल्हा धार (मध्यप्रदेश) व त्यापैंकी एक विधीसंघर्ष बालक असल्याचे सागितले,1 जण शेजारीच असलेल्या ऊशाचे शेतातुन पळुन गेला, त्याचे जगदिश नानसिंग सिंगाड रा. काकडवाल ता.कुक्षी जिल्हा धार (मध्यप्रदेश) (परांगदा) हा असलेचे ताब्यातील यंशयित‌ चोरट्यांनी सांगीतले.







त्यांची अंगझडती घेतली असता, केराम मेहडा याचे पँटचे मागील बाजूस कमरेला एक लोखंडी कटावणी व खिश्यात रोख‌ रक्कमेसह एक मोबाईल तसेच उदयसिंग मेहडा याचे पँटचे मागील बाजूस कमरेला एक मार्तूल व खिश्यात मोबाईल तर गुड्या मेहडा याचे पँटचे मागील खिश्यात लोखंड कापण्याची कैची व खिश्यात मोबाईल

आणि हरी मेहडा यांचेकडील पिवळ्या सॅकमध्ये एक बॅटरी व 10 इंची पोपट पाणा, वेगवेगळी कपडे आणि मिरची पुड घड्याळ, चांदीचा ग्लास चांदीचे प्रेसलेट,चांदीचे नाणे, पॉवर बैंक तसेच मोबाईल‌इत्यादी साहित्य मिळाले.









त्याचे कब्जात मिळाले साहित्याबाबत सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी त्याना विश्वसात घेऊन चौकशी करता त्यांनी सांगितले की, आम्ही सर्वजण मध्यरात्रीचे वेळी परीसरात लुटमार व चोऱ्या करणेसाठी आलो होतो. असे सांगताच प्रत्येकास स्वतंत्रपणे विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांच्यापैकी केरामसिंग मेहडा याने सांगितले की, सुमारे 3 दिवसापुर्वी मध्यरात्री आम्ही सर्वांनी मिरज इस्लामपूर साखर कारखाना जवळच असले एका बंद घराचा कडी कोयंडा तोडुन घरातील चांदीच्या वस्तु, घड्याळ वगैरे चोरले असून मिळालेल्या वस्तू त्या चोरीतीलच आहेत. 







तसेच 1 वर्षापुर्वी व लॉकडावुन होण्यापुर्वी इस्लामपुर साखर कारखाना, सांगली साखर कारखाना परीसरात रात्रीचे वेळी बंद घराचे कडी कोयंडा तोडुन चोऱ्या केल्याची कबूली पथकाला दिली आहे.त्यांच्याकडून एकूण 23,360/- रु.किं.चा माल सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन त्याचे विरुध्द

कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दरोडा टाकण्याची तयारीत असताना मिळुन आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.








सदरचे आरोपी परराज्यातील असून यांनी सांगली सातारा, कोल्हापूर,पुणे ग्रामीण, पुणे शहर, या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे सांगत आहेत,त्यांच्याकडून आणखी गुन्हे शक्यता नाकारता येत नाही.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराय गायकवाड याचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,सहा पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत,मारुती साळुखे, सुनिल चौधरी,सुधिर गोरे,गजानन गस्ते, शशिकांत जाधय, किशोर कदम मेघराज रुपनर,अजय येदरे, सोहेल कार्तीयानी दिपक गठे, बजरग शिरतोडे, सायबर कडील कॅप्टन गुंडयाडे, प्रकाश पाटील, अरुण औताडे, संदीप गुरव, निलेश कदम, जितेद्र जाधव, मुदतसर पाथरवट, राहुल जाधव, संदीप पाटील, वैभव पाटील, मच्छिद्र बर्डे,अरुण सोकटे यांनी केली आहे.








सांगली : येथे‌ दरोडे,चौऱ्या करणाऱ्या

आंतरराज्य टोळीला पकडलेले आरोपी व पथक

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here