ग्रामपंचायतीसाठी पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र नाही

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवार (दि.24) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.

पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही.येत्या 30 तारखेपर्यंत इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.








डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात आलेल्या 

तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, शासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर गेल्या 15 तारखेला तहसीलदारांनी तालुकापातळीवर निवडणुकीची नोटीस प्रकाशित केली होती.





Rate Card





त्यानुसार दि.23 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. उमेदवारांना सार्वजनिक सुटी वगळून 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. तथापि अर्ज ऑनलाइन भरावयाचे असल्याने अर्जांची पिंटआऊट सार्वजनिक सुटी वगळून निवडणूक निरीक्षक कार्यालयाला सादर करावी लागणार आहे.






तालुक्यातील एकूण 30 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या शक्यतो बिनविरोध करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसल्याने निवडणुकीची धामधूम टाळण्याकडे स्थानिक नेतृत्वाचा कल असल्याचेही दिसते.






दि. 23 ते 30 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे.31 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, 4 जानेवारीला अर्ज माघारी घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान तर 18 रोजी मतमोजणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.