माडग्याळ, वार्ताहर : व्हसपेठ ता.जत येथील जत-चडचण मार्गालगचे वनविभागाच्या हद्दीत आग लैगून सुमारे दहा एकरावरील शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत.या आगीत शेकडो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाले आहेत.वनविभागाने सध्या वनवा बाबत काळजी घेण्याची गरज होती.मात्र मुर्दाड अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ही आग लागली आहे.सध्या ऊन्हाची तीव्रता वाढत असल्याने आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.