शिक्षकांचा निवडणूकीच्या कामावर बहिष्कार
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत शिक्षकांना बिएलओ काम देण्यात येऊ नये,अन्यथा या कामावर बहिष्कार घालू,असा इशारा जत तालुका शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,मतदान प्रक्रियेत प्राथमिक शिक्षकांना प्रोसिडींग ऑफिसर म्हणून नेमणूक करू नये, महिला शिक्षकांची नेमणूक करू नये, दिव्यांग व वरिष्ठ शिक्षकांची नेमणूक करण्यात येवू नये.
यावेळी शिक्षक संघांचे जत तालुका अध्यक्ष प्रमोद कोडग, जकाप्पा कोकरे, देवाप्पा करांडे, उद्धव शिंदे, नानासो पडुलकर, बसवराज येलगार, अजीम नदाफ मौलाली शेख, भगवान नाईक, लक्ष्मण पवार, अर्जुन जाधव, आदी शिक्षक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जत आगामी निवडणूकीच्या कामावर शिक्षकांचा बहिष्कार घालणार असल्याचे निवेदन देण्यात आले.