जत,प्रतिनिधी : शिर्डी, अहमदनगर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन 19 व 20 डिसेंबर 2020 रोजी संपन्न झाले आहे. या अधिवेशनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातुन 1 खासदार व 10 आमदार निवडून आणू असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रभारी ज्ञानेश्वर सलगर व सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केले.राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनामध्ये देशातील 17 राज्यातून राज्य प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, तेलेंगाना, मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यासहित राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल.अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय महासचिव प्रसन्ना कुमार, राष्ट्रीय संघटक महाराष्ट्र प्रभारी पंडित बापू घोळवे , राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय संघटक गोविंदराम सुरनर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, महाराष्ट्र राज्य मुख्यमहासचिव बाळासाहेब दोडतले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सलगर व पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळावा, शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी, सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर व्हावा अश्या विविध मागण्या घेऊन वेळोवेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील 5 ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर्ती आंदोलने करून शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम केले. येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून पक्षाचे 5 लाख सभासद नोंदणी करण्याचा निश्चय करीत पश्चिम महाराष्ट्रातुन 1 खासदार व 10 आमदार निवडून आणू असे प्रतिपादन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केले.
या अधिवेशनाला पश्चिम महाराष्ट्रातुन माणिकराव दांगडे-पाटील, आण्णासाहेब रूपनवर, नितीन धायगुडे, काशिनाथ शेवते, भाऊसाहेब वाघ, पोपट क्षीरसागर, शाहिद मुलाणी, उमाजी चव्हाण, जयसिंग सुतार, खंडेराव सरक, किरण गोफणे, विनायक रुपनूर,अंकुश देवडकर, महेश मासाळ, वैशाली विरकर, वैभवी भिसे, पूजा घाडगे, सविता जोशी, कविता माने, भारती पाटील, दीपक चव्हाण,निलेश भुईटे, संदीप धुमाळ, गिरीदर ठोबरे, भारत म्हानवर, दिलीप गडदे उपस्थित होते.
आप्पासाहेब थोरात यांचा रासपमध्ये प्रवेश
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील काँग्रेस पक्षाचे युवक नेते आप्पासाहेब थोरात यांचा रासप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.2017 साली दारीबडची पंचायत समिती मतदारसंघातुन आवघ्या 47 मतांनी त्यांचा पराभव झाला होता.खंडनाळ गांवचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले आहे.
कॉग्रेसचे युवा नेते आप्पासाहेब थोरात यांचा रासपमध्ये प्रवेशानंतर संत्कार करण्यात आला.