खड्डे सोडेनात जतकरांची पाठ.! | नव्या रस्त्यांची वाताहत | खाबूगिरी, टक्केवारी आणि निकृष्ट कामांचा परिणाम
जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील दोन सार्वजनिक बाधकांम विभागाच्या हद्दीतील खड्डय़ांनी अनेकांचा बळी घेतला.आतापर्यंत कित्येकजण या खड्डय़ात पडून जखमी झाले आहेत. दरवर्षी रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही, आजअखेर नागरिकांना चांगले रस्ते मिळू शकलेले नाहीत. खाबूगिरी, टक्केवारी आणि निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. गेल्या दोन महिन्यापुर्वी झालेल्या पावसाने बाधकांम विभागाच्या रस्तेकामाचे पितळ उघडे पाडले.

अनेक ठिकाणी तर खड्डय़ांतून रस्ता शोधण्याची वेळ जतकरांवर आली. त्यात प्रशासन खड्डे मुजविण्यासाठी मुरमाऐवजी माती टाकून आपल्या आकलेचे तारे तोडले आहेत. पुन्हा पावसाने तेही वाहून गेले. काही ठिकाणी खडीकरण केले, तेही उचकटले! खड्डय़ांची ही उत्कृष्टता जतकरांसाठी निश्चितच भूषणावह नाही.