कॉग्रेस,राष्ट्रवादी एकत्र येणार का? | भाजपा स्व:बळावर ; तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही कस लागणार

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्यास निवडणुकीत भाजप एकटी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक निवडणुकीत तीन पक्षाची मोटबांधायची कशी? याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे. 
हे करताना बंडखोरी होण्याची शक्यता असून ती भाजपाच्या पथ्यावर पडू शकते. तूर्त तरी प्रमुख पक्षांनी गावनिहाय पॅनल उभारणीसाठी चाचपणी सुरू केली आहे.

तालुक्यात सत्ताधारी कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सांवत व भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे तुल्यबंळ गट आहेत.गतवेळी त्यांच्याच गटाकडे मोठ्या ग्रामपंचायतीची सत्ता होती.दुसरीकडे कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश शिंदे यांनीही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जोडण्या सुरू केल्या आहेत.


अन्य स्थानिक आघाड्या,शिवसेना,

रासप,रिपाइं,बहुजन बहुजन वंचित आघाडी,दलित पँथर हेही या निवडणूक चूणूक दाखविण्याची शक्यता आहे.तालुक्यात कांग्रेसचे आ.सांवत,राष्ट्रवादीचे शिंदे महाविकास आघाडीचा धर्म पाळणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या निवडणुकांसाठी 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहे. त्यांची छाननी 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 पासून होणार असून 4 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
Rate Cardयाच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.15 जानेवारी रोजी मतदान होऊन 18 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. निवडणुकीसाठी अत्यल्प कालावधी राहिल्याने प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपाने यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आपले बळ असलेल्या भागातील ग्रामपंचायतीत पॅनल देण्यासाठी बैठकावर भर दिला आहे. 


त्यामुळे पुढील काही दिवसातच निवडणुकीचे नेमके चित्र पुढे येईल. तूर्त तरी मोचर्चेबांधणीवर सर्वांचाच भर आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही कस लागणार आहे.आपापल्या मतदार संघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती स्वत:च्या पक्षाकडे खेचण्याची रणनिती आमदारांकडून आखली जात आहे.विलासराव जगताप विक्रम सांवत फोटो कॉमिक्स लावा

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.