जत शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा फज्जा | कोट्यावधीचा चुराडा : दुर्गंधी,अस्वच्छता कायम

0जत,प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा मंत्र पुकारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला. या अंतर्गत शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून प्रबोधनातून बाळकडू पाजले.तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे चित्र जत परिसरात पहावयास मिळत आहे.

जत नगरपरिषदेकडून स्वच्छ सर्वेक्षण 2021 अभियानाची मोठी जाहिरात करत कागदपत्री कोट्यावधीचा चुराडा करत आहे.मात्र अर्धवट कामामुळे अस्वच्छतेचा कळस झाला आहे. नागरिकांसाठी शौचालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र या शौचालयाला पुढे उदासीनतेची दृष्ट लागली.आता शहरातील सामूहिक शौचालये बेवारस पडून आहे.ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवून द्यायचे, स्वच्छतेचा दिंडोरा पिटायचा आणि आपणच त्यासाठी काहीच करायचे नाही, असे समिकरण येथील पदाधिकाऱ्यांनी अवलंबल्यजाचे दिसून येते. लाखो रुपये खर्चून अर्धवट बांधलेले शौचालये ग्रामस्थांना उपयोगात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
Rate Cardसंपूर्ण शहर,गावे दुर्गंधीने व अस्वच्छतेने बरबटलेले असतानाच उघड्यावरील प्रात: र्विधीमुळे तर मोठे संकट निर्माण झाले आहे.जत शहरासह गावागावात असेच चित्र निर्माण झाल्याने शेवटी स्वच्छतेसाठी लोक चळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त झाले. या चळवळीत अनेक गावे सहभागी झाली. मात्र या चळवळीला कुशल व धोरणी नेतृत्वाचा अभाव असल्याने आज घडीला स्वच्छता अभियान नावापुरतेच मर्यादित राहिले आहे. स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. 


हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावेच्या गावे कचरामय होताना दिसत आहेत.स्वच्छ भारत मिशनमुळे स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला व्हायला पाहिजे होती. मात्र ती अद्यापही झालेली नाही. यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. परिणामी या योजनेचा फज्जा उडाल्याची चित्र परिसरात दिसून येत आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.