करजगीत अवैध वाळू साठा शेतकऱ्यांनी पकडून दिला
करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत येथील बोर नदीपात्रात पुन्हा वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे.तत्कालीन अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या बेधडक कारवाईमुळे बंद झालेली वाळू तस्करी पुन्हा जोमाने सुरू आहे.शनिवारी मध्यरात्री गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर नदीत मोठी वाहने लावून वाळू काढण्याचे काम तस्कराकडून सुरू होते.पहाटे दोनच्या सुमारास काही शेतकरी वाहनाच्या आवाजाने उठून तिकडे गेले.शेतकरी आल्याचे पाहताच वाळू तस्करांनी वाहने शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्याची भिती दाखवत वाहने पळवून नेहली आहेत.
करजगीतील नदीपात्रातील वाळू तस्करीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने वाळू काढण्यास शेतकऱ्यांने मज्जाव केला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून वाळू तस्करी बंद होती.मात्र गेल्या काही दिवसापासून वाळू तस्करांनी डोके वर काढले आहे.नदी काठावरच्या शेतीचे नुकसान करत वाळू काढण्यात येत होती.
शनिवारी पहाटे दोनच्या दरम्यान काही वाहनाने वाळू नदीतून बाहेर काढत मोकळ्या रानात डेपो मारण्यात येत होता.वाहनाच्या आवाजाने काही शेतकरी वाहनाच्या दिशेने धावले.

शेतकऱ्यांची चाहूल लागताच वाळू तस्करांनी शेतकऱ्यांच्या अंगावर वाहने घालण्याची भिती दाखवत पळवून नेहली आहेत.दरम्यान पोलिस पाटील,कोतवाल, शेतकऱ्यांनी तलाठी बामणे यांना कळविल्यानंतर त्यांनी तस्करांनी डेपो मारलेली सुमारे 10 ब्रास वाळू जप्त केली आहे.खड्ड्याचा पंचनामा करण्यात आला आहे.अज्ञात वाहनाविरोध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.
अप्पर तहसीलदार हनुमंत म्हेत्रे यांनी वाळू तस्कराविरोधात कारवाया वाढविण्याच्या सुचना केल्या आहेत.
करजगी ता.जत वाळू तस्करांना साठा केलेली वाळू शेतकऱ्यांनी पकडून दिली आहे.