जत,प्रतिनिधी : बसरगी ता.जत येथे कृषी विभागाकडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत ‘जमिन आरोग्य पत्रिका शेती प्रशिक्षण’ शिबिर संपन्न झाले.कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ,जिल्हा मृद सर्व्हेक्षण चाचणी अधिकारी अमित कवठेकर,कृषि विज्ञान केंद्र कांचनपूरचे शास्ञज्ञ शैलेस पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात जमिन आरोग्य पत्रिका वाचऩ,त्यातील घटक, जमिनीचा विकास करून उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करणे व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून दुष्काळ, पूर, हवामानातील बदलावर मात करणे व अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पन्न वाढविणे आदीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जमिनीचा कस/सुपीकता दाखवणा-या नकाशांच्या आधारे, मातीतील मॅक्रो आणि मायक्रो पोषक द्रव्यांच्या चाचणीवर तसेच खते इत्यादींच्या योग्य वापरावर आधारित मातीच्या व्यापक आरोग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून संतुलित खताची मात्रा,जैविक खते,सेंद्रिय खते,हिरवळीचे खते,त्यांचा जमीन सुधारण्यासाठी वापर कसा करावा,याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या मंगल नामद,आप्पासाहेब नामद,सोसायटीचे चेअरमन शिवाप्पा तावशी,संरपच,सदस्य,प्रमुख लोकप्रतिनिधी शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन संगय्या स्वामी,हणमंत पटेद यांच्या शेतावर करण्यात आले.तालुका कृषी अधिकारी श्री.सातपुते, मंडळ अधिकारी बामणे,धनाजी सुतार,लक्ष्मण पवार उपस्थित होते.एस.के.थोरात यांनी प्रास्ताविक केले.
बसरगी येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्य पत्रिका शेतकरी प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.