येळवी,बागेवाडी लुटीतील आरोपी मोकाटच | दोन घटनेनंतर नवी घटना ; जत पोलीसांनी सतर्क होण्याची गरज

0




जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील येळवी व बागेवाडी लुट प्रकरणातील संशयित अद्याप मोकाटच असून दोन्ही घटनेतील आरोपीचा शोध 

लावण्यात जत पोलीसाची पथके अपयशी ठरत असल्याने अशा घटना घडविणाऱ्या संशयिताचे बळ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

22 नोव्हेबरला येळवी- जत‌ रस्त्यावर महिलेला लुटण्याचा प्रकार घडला आहे.निलाबाई महादेव नरळे (वय 50,टोणेवाडी,सध्या अलिबाग,जि.रायगड) यांच्या गळ्यातील मंगळसुत्र,कानातील फुले‌ असे अडीच तोळ्याचे दागिणे लुटण्याचा प्रकार समोर आला होता.










तर बुधवारी (ता.14)कुंभारी-बागेवाडी रोडवर चारचाकी गाडीतून नेहत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घटली आहे.यात गयाबाई भास्कर करपे(वय 65,रा.करोली टी) यांच्या गळ्यातील सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिणे चार संशयितानी काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.दोन्ही घटनेचा जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.









वयोवृद्ध एकट्या करपे यांना बघून संशयित चोरट्यांनी त्यांना चारचाकी वाहनात बसवत चाकूचा धाक दाखवून धमकावत दागिणे काढून घेतले आहेत.यापुर्वी येळवी-जत रस्त्यावर अशी घटना घडली होती.त्यावेळी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी आपले कसब पणाला लावून आरोपीच्या काही दिवसात मुसक्या आवळल्या होत्या.मात्र त्याच रस्त्यावर पुन्हा 22 नोव्हेंबरला निर्जन स्थळी  लुटलीची घटना घडली आहे.त्यानंतर पुन्हा महिन्याभरानंतर तशीच घटना बागेवाडी रोडवर घडली आहे.


Rate Card









त्यात चार संशयितांनी चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे दागिणे काढून घेत पळ काढला आहे.दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेेने भितीचे वातावरण पसरले आहे.

दोन्ही घटनेतील फिर्यादी अजूनही दहशतीखाली आहेत.नव्या दोन्ही घटनातील साम्य एकसारखे दिसत असले तरीही संशयित मात्र वेगळे असण्याची शक्यता पोलीसांना वाटत आहे.दरम्यान पोलीसांनी या घटनेतील संशयितांना तातडीने अटक करण्याची गरज निर्माण झाली आहे.अशा निर्जन रस्त्यावर गस्त वाढवावी,अशी मागणी होत आहे.










जत‌ पोलीसाकडून संशयित गाडी व आरोपीचा शोध सुरू आहे.संशयित गाडी व आरोपीबाबत काही माहिती मिळाल्यास द्यावी,असे सोशल मिडियावरूनही आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान पोलीसाकडून संबधित मार्गावरील सीसीटिव्ही,रस्त्यावरील व्यवसायिकांकडून माहिती मिळविण्यात येत आहे.पोलीसाची पथके विविध भागात संशयिताचा शोध घेत आहेत.संशयिताच्या मुशक्या लवतरचं आवळू असे पो.नि.उत्तम जाधव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.