शहराचा चेहरा-मोहरा धुळीने माखला

0
3



जत,प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून शहराचा विकास होतोय का शहर भकास होत जात आहे ? असा प्रश्न जतकरांना पडला आहे. वर्षभरात शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपले आश्वासन पाळत, शहराचा चेहरा-मोहरा धुळीने माखवून दाखविला आहे. मुख्य भागातील रस्ते असो वा उपनगरातील रस्ते सर्वदुर रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. रस्त्यांचा दुर्दशेमुळे सर्वच घरे धुळीने माखली आहेत. रस्त्यावर विक्री होणारी फळे भाज्या व पदार्थांवर देखील धूळ बसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर तर परिणाम होत आहे.



या प्रकारामुळे घरात व दुकानांमध्ये नेहमी धूळ साचत असल्याने दिवसभरात दहा वेळा साफसफाई करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी ‘संकेत टाइम्स’ शी बोलताना दिल्या.शहरातील रस्त्यांचे काम पूर्णपणे थांबले आहे. त्यातच नगरपरिषदेकडून रस्त्यांची डागडूजी देखील केवळ नावालाच केली जाते. त्यामुळे काही दिवसातच त्या दुरुस्तीचे पितळ उघडे पडते. 



अनुभवली भयंकर परिस्थिती
‘जत-गुहागर शहरातील महामार्ग,मुख्य बाजार पेठेतील रस्ते,विविध चौकात, या सर्व रस्त्यांवर प्रचंड धुळ पहायला मिळाली. या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते.पदार्थ, फळांवरही धुळच्-धुळ,फळं, पदार्थ व भाजीपाल्यावर देखील प्रचंड धुळ बसते. त्यामुळे फळ विक्रेतेही त्रस्त झाले आहेत.वातावरणात धुलीकणांचे वाढले प्रमाण गेल्या दोन वर्षात शहरातील हवेच्या अहवालात वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. 



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here