मोबाईल कंपन्याना कोन विचारणार आहे का ? इंटरनेट नव्हे,फोनही लागेनात ; बँलस् वर मात्र डल्ला

0माडग्याळ,वार्ताहर : जत तालुक्याती सर्वच मोबाईल कंपन्यांच्या विस्कळीत

सेवेमुळे परिसरातील मोबाईल ग्राहक नाहक त्रस्त होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यात मोबाईल

वापरणाऱ्या सर्वच कंपनीचे ग्राहक

विस्कळीत नेटवर्क सेवेमुळे चांगलेच हैराण होत असल्याचे दिसत असून तासन् तास रेंज बंद पडत आहे. आयडीया, व्होडाफोन, एअरटेल, जीओसह आदी कंपनीच्या मोबाईल सेवा

पूर्णपणे आलटून पालटून बंद पडत असल्याने अनेक दिवसांपासून ग्राहकाना त्रास सहन करावा लागत आहे.फोन न लागणे, इंटरनेट सेवा बंद पडणे, वारवार रेंज बंद पडणे, फोन लागला तरी आवाज न येणे आदी प्रकार घडत असून यामुळे काही ग्राहक त्या कंपनीची सेवा यापेक्षा बरीच असे म्हणत सिम दुसऱ्या कंपनीत पोर्ट करत असूनही त्यांचे मात्र तिकडे ही समाधान मात्र होतांना दिसत नाही. बँका, शासकीय कार्यालये, पतसंस्था, कॅफे सेंटरही या विस्कळीत सेवेमुळे डोकेदुखी बनत आहे. मोबाईल कंपन्यांनी अनलिमीटेड डाटा फ्रि या सुविधेतून ग्राहक रिचार्ज करून पूर्ण लाभ न मिळता त्यातील काही तास, दिवस फुकट वाया जातात. 

परंतु बॅलन्स मात्र तारखेवरच संपते. फोरजीचे रिचार्ज केल्यानंतरही टुजी,थ्रीजीचीच रेंज मिळते. त्यातही नेटला गती मिळत नाही. या मोबाईल नेटवर काहींनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले.मात्र तासन् तास रेंज बंद राहत असल्याने सर्वांचेच नूकसान होत आहे.एखाद्यावेळेस आयडीयाला रेंज आली तर इतर बंद पडतात. आज मोबाईल मनुष्याच्या जीवनाचा महत्वाचा घटक बनला असून व्यवहारात देवाण घेवाण,संपर्कसह सर्वच यावर अवलंबून आहे. करिता सर्वच मोबाईल कपनीच्या वरिष्ठांनी तात्काळ दखल घेवून जत तालुक्यातील ग्रामीण भागातील

टॉवरवरून मिळणारी सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहक बांधवांकडून व्यक्त होत

आहे.


Rate Card


इंटरनेट सेवा जीवनातील अविभाज्य घटक


जत तालुक्यात  बहुतांश मोठ्या गावात  मोबाईल टॉवर आहेत. या माध्यमातून या माध्यमातून ग्राहकांना सशुल्क सेवा दिली जात आहे. आजकाल ग्राहकांची दैनंदिन कामे इंटरनेटवर केली जाते.  बँकिंगसह शैक्षणिक तसेच शेतीविषयक बहुतांश कामे ऑनलाईन करावी लागतात. यासाठी इंटरनेटसेवा योग्य असणे तसेच वेगसुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून विविध प्रकारची दाखले प्राप्त करण्याकरिता सेतू केंद्रातूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. यासाठीसुद्धा इंटरनेटसेवा तीव्र वेगाची व सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून येथील कव्हरेज व इंटरनेटचा बोजवारा उडाला आहे.


विद्यार्थी, शेतकरी व ग्राहकांना विविध कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या संदर्भात अनेकदा खाजगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना  कळविण्यात आले. मात्र त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी योग्य सेवा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.