संखमध्ये सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते ‘बाबा जल’चा शुभारंभ

0
1



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील संख येथे सयाजी बाबा बिसलरी प्लॅन्टचा शुभारंभ विजापूर येथील ज्ञानयोगी परमपूज्य सिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला.संख येथील श्री.संत बागडेबाबा आश्रमाच्या आवारात चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांनी श्री संत बागडेबाबा यांचे मंदिर उभारण्याचे काम सुरू केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहेत तसेच याच ठिकाणी सयाजी बाबा बिसलरी प्लॅन्ट उभारण्यात आला आहे.









ज्ञानयोगी परमपूज्य सिध्देश्वर महास्वामीजी यांनी संख येथील आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या कामाची पाहणी केल्यानंतर तुकाराम बाबा महाराज यांनी सुरू केलेल्या सयाजी बाबा बिसलरी प्लॅन्टचे उद्घाटन सिद्धेश्वर म्हास्वामीजी यांच्या हस्ते झाले. यावेळी बालगाव येथील गुरुदेव आश्रमचे डॉ अमृतानंद महास्वामीजी, इचलकरंजी गुरुदेव आश्रमाचे महेशानंद स्वामीजी, बिळूर गुरुदेव आश्रमाचे महेशानंद स्वामीजी, जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील, रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील, रासपचे शहराध्यक्ष भूषण काळगी, संतोष पाटील सजेय धुमाळ मानव आदीकारी पुणे  यांच्यासह संख ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.









सिद्धेश्वर म्हास्वामीजी म्हणाले, चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या काळात जे निस्वार्थपणे कार्य केले त्यातून त्यांची सामाजिक बांधिलकी तर दिसून आलीच पण त्याचबरोबर संतांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचे कार्य सुरू आहे याचा मनस्वी आनंद वाटला. 










बाबा जलचे उत्पन्न सामाजिक कार्याला


दुष्काळी जत तालुक्यातील प्रत्येक गावात जल चळवळ उभी राहिली पाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.जत तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी अहोरात्र झटण्याची आपली तयारी आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्राच्या माध्यमातून जत तालुक्यात सामाजिक कार्य सुरूच राहणार आहे. संख येथे बाबा जल या बिसलीरी प्लॅन्टचा शुभारंभ करण्यात आला आहे. यातून जे उत्पन्न मिळणार आहे ते जत तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी खर्ची करण्यात येणार असल्याचे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांनी यावेळी बोलताना सांगितले.








 संख ता.जत येथील बाबा जल या उद्योगाचा शुभारंभ सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ. अमृतानंद महास्वामीजी,महेशानंद स्वामीजी, तुकाराम बाबा 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here