जत,प्रतिनिधी : दि.सांगली सॅलरी अर्नर्स को – ऑप. सोसायटी लि: सांगली या संस्थेतर्फे “सॅलरी आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत सभासदांच्या अडीअडचणी, समस्या इ. ची सोडवणूक करणेकामी तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या बहुमुल्य सुचना, मार्गदर्शन जाणुन घेणेकरिता व नविन सभासद वाढीकरिता शुक्रवार
दि.9 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य प्रशासकिय इमारत, विजयनगर, सांगली येथे चेअरमन,
संचालक व संस्थेचे कर्मचारी वर्ग यांनी भेट दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसुल कर्मचारी संघटनेचे राजू कदम व मुख्य प्रशासकिय इमारतीमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे संदिप सकट व ऑडीट विभागाचे मिलींद वझे यांनी चेअरमन व संचालक यांचे पुष्प देवून स्वागत केले.जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य प्रशासकिय इमारतीमधील विविध शासकिय कार्यालयांतील सभासद तसेच इतर कर्मचाऱ्यांची भेट घेवून त्यांचे प्रश्न तसेच अडीअडचणी समजावून घेवून त्याचे निवारण करण्याचे आश्वासन संस्थेचे चेअरमन अभिमन्यु मासाळ यांनी दिले.
यावेळी गत 5 वर्षाच्या विद्यमान संचालकांनी सभासदांकरिता व संस्थेच्या हिताकरिता राबविलेल्या व केलेल्या कामकाजाच्या आढावाचे माहितीपत्रक सर्व सभासदांना देण्यात आहे. सदर उपक्रमास सभासदांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. सभासदांनी संस्थेच्या एकंदर कामकाजा बाबत समाधान व्यक्त करुन संचालकांनी संस्थेच्या भरभराटी मध्ये दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे संचालक लालासाहेब मोरे, शरद पाटील, झाकीरहुसेन चौगुले, जाकीरहुसेन मुलाणी,अनिल पाटील, जे. के. पाटील, सुहास सुर्यवंशी, अश्विनी कोळेकर, राजेंद्र कांबळे, मलगोंडा कोरे,अरुण बावधनकर, गणेश जोशी, राजेंद्र बेलवलकर, राजु कलगुटगी तसेच सेक्रेटरी वसंत खांबे व कर्मचारी उपस्थित होते.
सॅलरीच्या “सॅलरी आपल्या दारी” या उपक्रमास सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरूवात करण्यात आली.