हळ्ळीतील मागासवर्गीय वस्तीचा पाणी प्रश्न मिटला

0बालगाव,वार्ताहर : हळ्ळी ता.जत येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये अनेक दिवसापासून पाणी टंचाईचा प्रश्न लोकहितासाठी काम करणाऱ्या तरूणानी निकाली काढला.

हळ्ळी गाव भागात मागासवर्गीय वस्ती आहे.येथे स्वातंत्र्य काळापासून पाण्याची स्वंतत्र व्यवस्था नव्हती.त्यामुळे महिला,मुलींसह वयोवृद्ध नागरिकांनी पाण्यासाठी पायपीठ करावी लागत होती.


Rate Card


उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.यांची कल्पना ग्रामपंचायतीला देऊनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र समाजासाठी काम करणारे काही युवक एकत्र येत मदत गोळा करून येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपविला आहे.पाण्याची टाकी,पाईप व चाव्या बसविण्यात आल्या आहेत. यावेळी सिध्दराम बिरूनगी,गणेश अदमाने,महेश कवडे,आंबांना अजमाने,संजय केंगार,कल्लाप्पा कट्टीमनी,सतिश अजमाने आदी तरूणांनी हा उपक्रम राबविला.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.