जतच्या या नेत्याने ‌दिला धनगर आरक्षण प्रकरणी भाजपला महिन्याचा अल्टिमेटम | जतेत निषेध आंदोलन

0



जत,प्रतिनिधी : धनगर समाजासाठी ‘एसटी- बी’ आरक्षणाची तरतूद तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने केल्याचे जाहीर विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.









यापार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाच्या तरतुदीसंबंधीची कागदपत्रे सात दिवसांत सादर करावीत, असे आव्हान धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक वतालुक्याचे युवानेते विक्रम ढोणे यांनी दिले होते. त्यावर चंद्रकांत पाटील पुरावे देवू शकले नाहीत,त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देत आज ता.14 जतमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच त्या संबंधीचे निवेदन जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.









दि. 21 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यातील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला ‘एसटी- बी’आरक्षणाची तरतूद केल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर लगेचच धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी चंद्रकांत पाटील हे समाजाची दिशाभूल करीत असल्याची जाणीव करून दिली होती तसेच चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणा संबंधीची कागदपत्रे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावीत. यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देत जत तहसिलदार कार्यासयासमोर निषेध आंदोलनाची घोषणा त्यांनी केली होती.


Rate Card








दरम्यानच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नाही, तसेच कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे आज जत तहसिल कार्यालयाबाहेर आंदोलन करून चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला. 









या आंदोलनात नाथा पाटील,रमेश कोळेकर,किसन टेंगळे,अतुल शिंदे, युवराज खांडेकर,ज्ञानेश्वर वगरे,महांतेश पाटील,रवी कित्तुरे,बाळू मासाळ, विलास सरगर,तात्या खांडेकर,सचिन लोखंडे, मल्लाप्पा करे,आपासो खांडेकर,कित्तुरे  आदी उपस्थित होते. 


जत येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात ‌पाटील यांच्या विरोधात विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.