पुन्हा प्लास्टिकचे पेव! | कारवाई थंडावल्याने बंदी निष्प्रभ; फेरीवाल्यांना पिशव्यांचा पुरवठा करणारी साखळी.
जत,प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी प्लास्टिकबंदी कायद्यांतर्गत प्लास्टिक पिशव्यांविरोधात सुरू असलेली कारवाई करोना काळात थंडावल्याने निष्प्रभ झाली आहे.जत तालुक्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे.
प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला.
त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यावर प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर मर्यादा आल्या होत्या.
मात्र कारवाई शिथिल होताच पुन्हा या पिशव्यांचा वापर वाढला आहे.करोना विरोधातील लढाईत यंत्रणा अडकल्याने शहराच्या अनेक भागांत खुलेआम प्लास्टिकच्या पिशव्यांतून वस्तू दिल्या जात असल्याचे पाहणीत आढळले.
प्रत्येक भाजी विक्रेत्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या होत्या.बंदीबाबत विचारले असता पालिकेकडून कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरे म्हणजे पाकिटावर पिशव्या 60 मायक्रॉनपेक्षा जाड असल्याचे नमूद असूनही त्या त्याहून कमी जाडीच्या बंदी असलेल्या पिशव्याच होत्या.आम्ही सुरुवातीच्या काळात प्लास्टिक पिशव्यांतून विक्री बंद केली होती, मात्र ग्राहकांकडूनच मागणी होत असल्याने आमचा नाइलाज होतो,’ असे काही विक्रेत्याने सांगितले.