आटपाडीतील कारखान्याच्या साखर अपहार गुन्ह्याचा उलगडा | दोन आरोपी जेरंबद
सांगली : आटपाडी येथून झालेल्या साखर अपहार गुन्ह्याचा उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केला.याप्रकरणी मुद्देमालासह दोन आरोपीना जेरंबद केले आहे.
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम,अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुवुले यांनी घरफोडी जबरी चोरी,मोटार सायकल चोरी या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी पकडत गुन्हे उघड करण्याचे आदेश जिले आहेत.त्यानुसार पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या पथकाने घरफोडी जबरी चोरी,मोटार सायकल चोरी या गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपीचा शोध सुरू केला आहे.
त्यात दिनांक 9 डिसेंबरला आटपाडी पोलीस ठाणेच्या राजेवाडी सदगुरु साखर कारखाना येथील गौतम शुगर ट्रेडिग कंपनीची 30 टन साखर,एमएच 45 एएफ 4009 या ट्रकमध्ये भरून ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमेटेड एमआयडीसी शिरुर पुणे येथे पोहचविण्यास सांगितले असता, ट्रक मालक व चालक यांने सदरचा माल
ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड एमआयडीसी शिरुर पुणे येथे न पोचवता परस्पर घेऊन साखरेचा अपहार केल्याचा मेसर्स शुगर ट्रेडिग कंपनी नाना पेठ तर्फे तुषार दत्तात्रय मेहता वय- रा,एकोपा सोसायटी मार्केट यार्ड पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
सहा. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत व कर्मचारी यांनी सदर
गुन्ह्याचे ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचे माहिती घेऊन पुढील तपास चालू केला, या गुन्ह्याचे अनुषगाने माहिती घेत बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या माहितीच्या आधारे बलवगडे याचे
गायरानात एक संशयास्पद काहीतरी भरुन ट्रक थांबला असल्याबाबत माहिती मिळाली.मिळाले माहिती प्रमाणे सदर ठिकाणी छापा मारला असता,त्या ट्रकमध्ये अनिल शरणाप्पा माळी (वय 21),विकास शिवाजी भोसले (वय 35) (रा.दोघे मळणगाव ता.कवठेमहकाळ) असे असल्याचे सांगितले,त्यावेळी त्याचे कब्जात असलेला ट्रकमध्ये साखरेने भरलेली पोती आढळून आली. याबाबत त्या दोघाकडे चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.
पोलीसानी दोघाना विश्वासात घेऊन चौकशी करता त्यानी सागितले की,पुणे येथे पोहच करण्यासाठी भरलेली साखर आम्ही दोघानी मिळुन ताब्यातील ट्रकचा नंबर एम एच 09|5976 हा लावून पुणे ऐवजी परस्पर विक्री करण्यासाठी आणल्याची कबूली पोलीसांना दिली आहे.दोघांना ताब्यात घेत ट्रक व तीस टन साखर असा 26,96,146 रूपयाचा मुद्देमाल जप्त केली आहे. सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.