गुड्डापूरमध्ये 13 पासून तीन दिवस जमावबंदी आदेश ; प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांची माहिती | सर्व बाजूचे रस्तेही बंद करणार

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री.दानम्मादेवी देवस्थानची 13 डिसेंबर ते  16 डिसेंबर अखेर होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.तरीही यात्रा काळात कर्नाटक, महाराष्ट्रातील भाविकांचे जथ्ये गुड्डापूरमध्ये येण्याची शक्यता असल्याने तालुका प्रशासनाकडून

मंदिरापासून पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात प्रंतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून 144 कलम अन्वये प्रतिंबधात्मक आदेश लागू करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी दिली.












आवटे म्हणाले,तालुक्यातील गुड्डापूर मोठे धार्मिक स्थळ असल्याने कर्नाटक, महाराष्ट्रातील मोठा भाविक वर्ग यात्रेसाठी येत असतो.मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यात्रा देवस्थान कमिटीकडून यापुर्वीच रद्द केली आहे.तरीही धार्मिक श्रध्दा असल्याने भाविक गुड्डापूरमध्ये मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.त्यापार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी ता.13 डिसेंबर रात्री 12 पासून 16 डिसेंबर रात्रीपर्यत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.दानम्मादेवी देवस्थान परिसरातील चारी बाजूच्या पाच किलोमीटर परिसरात 5 किंवा त्यापेक्षा जादा व्यक्तीना एकत्र फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.भाविकांनी सहकार्य करावे,असे आवाहन आवटे यांनी केले.








Rate Card




डिवायएसपी रत्नाकर नवले म्हणाले,गुड्डापूर देवस्थान परिसरात भाविकांनी गर्दी करू नये यासाठी गुड्डापूरला जोडणारे सोलापूर-चडचडण-उमदी मार्गावर व्हसपेठमध्ये,अथणी-मुंचडीमार्गे जतकडून येणाऱ्या भाविकांना सोर्डीमध्ये,विजापूर-तिकोटा-यत्नाळ-तिकोंडी-संख मार्गे येणाऱ्या भाविकांना आंसगी येेथे रोकण्यात येणार आहे. येथून पुढे रस्ते बंद करण्यात येणार आहेत.इतर मार्गावर वाहतूक सुरू आहे.या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 131 अन्वेय कारवाई करण्यात येईल,असेही नवले म्हणाले.

देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी म्हणाले,कोविडचा प्रभाव अजूनही कायम आहे.











त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी यात्रा रद्द करण्यात आली आहे.सालाबादप्रमाणे होणार धार्मिक कार्यक्रम मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत कमिटीकडून करण्यात येणार आहेत.यात्रा कालावधी सोडून इतर दिवशी मंदिर दर्शनासाठी खुले आहे.कोरोनाचे नियम पाळत,गर्दी न करता भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा,असे गोब्बी म्हणाले.यावेळी तहसीलदार सचिन पाटील, पो.नि.उत्तम जाधव,देवस्थान समितीचे सदस्य,पुजारी उपस्थित होते.




गुड्डापूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलताना प्रांताधिकारी प्रंशात आवटे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.