येळवी,वार्ताहर : येळवी ता.जत येथील ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्थेतर्फे रक्तदान शिबिर व प्रधानमंत्री जनआरोग्य योजेने अंतर्गत “आयुष्यमान भारत – गोल्डन कार्ड “आरोग्य शिबीराचे सोमवार दि.14 डिसेंबरला आयोजन केले आहे.
ओंकार स्वरुपा इंग्लिश मिडीयम स्कूल अँण्ड ज्युनि.काॅलेज येळवी येथे सकाळी ठिक 10 वाजता हे शिबीर संपन्न होणार आहे.राज्यभरातील रक्त तुटवडा यामुळे रुग्णाचे हाल होऊ नये,यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजेने अंतर्गत आयुष्यमान भारत(गोल्डन कार्ड) यासाठी ‘गोल्डन कार्ड’ या विशेष कॅम्पचे आयोजन सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत, प्रत्येक कुटुंबासाठी वर्षाकाठी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा ठेवण्याची योजना आखली गेली आहे,याचा 50 कोटीहून अधिक लोकांना फायदा होईल आणि ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे.या योजनेतील लाखांच्या रकमेमध्ये तपासणी, औषधोपचार, इस्पितळात प्रवेश इत्यादी सर्व खर्चाचा समावेश असेल,असे औंकार स्वरूपाचे संतोष पाटील यांनी सांगितले.
रक्तदान,आयुषमान भारत लोगो वापरा