विजापूर-गुहागर महामार्गाचे काम निकृष्ट | रिपाइंचे निवेदन ; गुणनियत्रंक विभागाकडून तपासणी करा

0



जत,प्रतिनिधी : जत शहरातून गेलेल्या

विजापूर – गुहागर महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून गुणनिंयत्रक विभागाकडून तपासणी करावी,अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे.

तसे निवेदनही कांबळे प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना दिले आहे.

आवटे म्हणाले की,केंद्र शासनाच्या प्राधिकरण विभागाकडून या महामार्गाचे कॉक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. जत तालुक्याच्या विकासाला दळणवळणाला चालना देणाऱ्या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग काम सुरू आहे. परंतु या महामार्गाचे गेली तीन वर्षे

अत्यंत मंद गतीने काम सुरू आहे.

यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. साईड पट्ट्या खचल्या आहेत. तसेच सदरचे काम नियमबाह्य सुरू आहे.या मार्गासाठी वापरली जाणारी खडी, वाळू ,सिमेंट, स्टील व अन्य साहित्य कमी दर्जाचे व कमी प्रमाणात वापरले जात आहे. या कामावर रस्ते प्रधिकरणचे अधिकारी तुषार शिरगुप्पे कधीच फिरकत नाहीत.बेकायदेशीर कामाला ते प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहकार्य करत आहेत. मनमानी व निकृष्ट दर्जाचे काम न थांबल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे.

गुहागर विजापूर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असून या कामाची सखोल चौकशी त्रयस्त अधिकारी,गुणनियंत्रण समितीकडून करावी.अर्धवट कामाची मालिका सुरूच आहे अनेक ठिकाणी अर्धवट कामे ठेवल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. यापुढील झालेले अपघातास रस्ते प्राधिकरण व संबंधित कंपनी जबाबदार धरावे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, महामार्ग साठी वापरले जाणारे साहित्य,अंदाजपत्रके तरतुदीनुसार योग्य दर्जाचे व योग्य प्रमाणात वापरावे. गुणनियंत्रण विभागाचे काम कागदावरच

Rate Card

सुरू आहे.प्रत्यक्षात सर्व साहित्याच्या चाचणी घेऊनच सदरचे काम करण्यास परवानगी देण्यात यावी.रस्ते प्राधिकरणाचे या कामावर असणारे उपअभियंता तुषार शिरगुप्पे यांच्या कामकाजा विषयी शंका निर्माण होत आहे.तरी त्यांची चौकशी करण्यात यावी. शहरातील सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे व नियम शासनाचे व नैसर्गिक नियम डावलून हे काम केले जात आहे.

अनेक ठिकाणी अप्रोच रस्ते करणे गरजेचे असताना हे रस्ते केले जात नाही.आतापर्यत केलेले दर्जाहीन झाले आहे.अत्यंत मंदगतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या कामात सुधारणा न झाल्यास जत तालुक्यात संघर्ष समिती स्थापन करून या मनमानी कामाविरोधात याचिका दाखल करणार आहोत.या संघर्ष समितीचे निमंत्रक म्हणून मी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील राजकीय,सामाजिक, वैद्यकीय, विधी तज्ञ, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या समावेश करून संघर्ष समिती

स्थापन करणार आहे. यापूर्वी रिपाइंच्या वतीने या महामार्गासाठी आंदोलन केले होते.भविष्यात हे काम दर्जेदार व्हावे म्हणून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहोत.

जत : शहरातील विजापूर-गुहागर महामार्गाचे निकृष्ठ कामाची चौकशी करावी या मागणीचे निवेदन प्रांत प्रंशात आवटे यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.