जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी पावसामुळे नैसर्गिक आपत्ती मधून झालेले नुकसान चार लोकांचे व आठ जणांचे प्राण गेले आहे.अशा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मधून शासनाकडून पाठपुरावा करण्यात आला,त्यामधून 9 लाख 67 हजार रुपये इतक्या निधीचे धनादेश त्या संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या बागायत व जिरायत शेतीचे मोठे नुकसान झाले होते.
त्या शेतकऱ्यांसाठी बागायत हेक्टरी 10 हजार रुपये व फळबाग क्षेत्र हेक्टर 25 हजार रुपये प्रमाणे सध्या 36 गावातील 8,061 बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर 2 कोटी 44 लाख 69 हजार रुपये इतकी रक्कम जमा झाले आहेत व उर्वरित 96 गावातील18136 बाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.त्यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. त्यांचीही पैसे लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले की, अतिवृष्टीमुळे 17 शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून जाऊन ती जमीन पूर्णपणे निकामी झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 92 हजार इतकी रक्कम जमा झाली आहे.
घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाले आहेत.त्याचे सर्व पंचनामे झाले असून अशा लोकांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे.अशा सर्व संबंधित व्यक्तींना व शेतकऱ्यांना शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे,असे आ.सावंत म्हणाले.







