शिक्षकांच्या प्रश्नासाठी सहकार्य करू : आ.विक्रमसिंह | सावंत सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण
जत,प्रतिनिधी : सांगली जिल्हा शिक्षक भारती तर्फे देण्यात आलेले सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते जत येथे साई प्रकाश मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सौ.आशाताई पाटील,जि.प.
सदस्य सरदार पाटील,उपसभापतीविष्णू चव्हाण,नगरपरिषदेचे शिक्षण सभापती भूपेंद्र कांबळे,विद्या प्रतिष्ठानचे अँड.प्रभाकर जाधव,शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,कृष्णा पोळ कादर आत्तार हे उपस्थित होते.
आ.सांवत म्हणाले,कॅशलेस विमा आरोग्य योजना शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे,शिक्षकांच्या विनंती बदल्या याबाबत राज्य स्तरावर संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बैठक घेऊन शिक्षक भारती सोबत राज्यस्तरावर प्रयत्न करणार आहोत.संघटनेच्या कामकाजासाठी आजपर्यंत सहकार्य केले आहे.भविष्यात निश्चितपणे शिक्षक भारतीला सहकार्य केले जाईल असेही आ.सांवत म्हणाले.
जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित प्रश्नांची तात्काळ सोडवणूक केली जाईल संघटनेच्या माध्यमातून आपण करीत असलेल्या कार्य कौतुकास्पद आहे,शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझे सहकार्य राहिल,असे शिक्षण सभापती आशाताई पाटील यांनीआश्वासन दिले.

सरदार पाटील म्हणाले, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.अँड.प्रभाकर जाधव म्हणाले,शिक्षण आणि आजची शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेचे संदर्भाने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी जे काही सहकार्य करावे लागेल ते करण्याची भूमिका आम्ही घेऊ असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जत तालुका शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केले याप्रसंगी जत तालुक्यातील आदर्श शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मल्लया नांदगाव,नवनाथ संकपाळ,जितेंद्र बोराडे,अविनाश सुतार,विनोद कांबळे,बाळासाहेब सोलनकर,रावसाहेब चव्हाण,जयानंद तुंगल,सिद्राम देसाई,बगली,धानापा कमते पदाधिकारी उपस्थित होते.आभार भाऊसाहेब महानोर यांनी मानले.
जत: सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण करण्यात आले.