श्रीकांत सोनवणेंचा बहुजन समाज पार्टी मध्ये प्रवेश !

0जत,प्रतिनिधी : युवा नेते श्रीकांत सोनवणे यांनी बहुजन समाज पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यांची शहर उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र जिल्हा प्रभारी अतुल कांबळे यांनी दिले. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष लहरीदास कांबळे,गौतम सुर्यपुत्र,जत विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे,पृथ्वीराज लोंढे,विजय कांबळे,जकाप्पा सर्जे यांनी केले.
यावेळी श्रीकांत सोनवणे म्हणाले,बहुजन समाज पार्टीच्या ध्येय धोरणानुसार वर्तन करुन वेळोवेळी वरिष्ठांकडून येणाऱ्या सुचनेनुसार काम करु तसेच सर्व बहुजन संत, गुरू,महापुरुष व बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कु. मायावतीजी यांनी फुले, शाहू,आंबेडकर व कांशीरामजी यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे जे कार्य करीत आहेत ते विचार पुढे घेऊन जाणेसाठी तन-मन-धनाने कार्यरत राहून पार्टीची शिस्त पाळून संघटनात्मक बांधणी करुन सर्व जातीधर्माच्या लोकांची बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून कामे करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु,असे म्हणाले.
Rate Card


यावेळी शहराध्यक्ष सुनिल क्यातन, विधानसभा प्रभारी महादेव कांबळे, विधानसभा प्रभारी हणमंत नाटेकर, महासचिव शरद शिवशरण, कोषाध्यक्ष प्रशांत बाबर, बापू आठवले, गजानन ऐवळे, बी.व्ही.एफ. संयोजक मेसाप्पा काटे, मल्हारी शिंदे,महेश कांबळे पत्रकार सचिन झेंडे, पत्रकार केराप्पा हुवाळे शहर महासचिव दिपक कांबळे व जत शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.जत : श्रीकांत सोनवणे यांचा बहुजन समाज पार्टी मध्ये कार्यकर्त्यांसह

जाहीर प्रवेश केला.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.