डफळापूर पेयजल योजना अतिंम टप्यात ; दिग्विजय चव्हाण

0डफळापूर, वार्ताहर : डफळापूर पेयजल योजनचे काम अंतिम टप्यात असून येत्या दोन-तीन महिन्यात ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी दिली.

अनेक संघर्षानंतर योजना पुर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.सध्या योजनेच्या गावभाग व दोन वस्त्या वगळता सर्व ठिकाणी पाईलाईन,दाबनलिका पुर्ण करण्यात आल्या आहेत.टाकी,शुध्दिकरण यंत्रणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे.

गावातील नळजोडण्या ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना देण्यात येत आहेत.योजनेचे काम सर्व ठिकाणी प्रगतीवर आहे.वाड्यावस्त्यांना जोडलेल्या पाईपलाईनची चाचणी घेण्यात येत आहे.सध्या सुरू गाव भागातील नळजोडण्याचे काम पुर्ण होताच गावात शुध्द व मुबलक पाणी सोडण्यात येणार आहे.सर्व अडचणीवर मात करत ग्रामपंचायत,पाणी पुरवठा समिती,सर्व राजकीय पक्षाकडून सहकार्य मिळत आहे.त्यामुळे योजना पुर्णत्वाकडे आली आहे.असेही दिग्विजय चव्हाण यांनी सांगितले.Rate Card
डफळापूर ता.जत येथे गावभागात नळजोडण्या सुरू आहेत.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.