जत,प्रतिनिधी : सांगली जिल्हा लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय आर.डी.कांबळे यांनी त्यांचे वडील कालकथित डी.ए.कांबळे यांच्या स्मरणार्थ जत पंचायत समिती मधील बागेत नागरिकांना व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सीमेंट बाकडी भेट देण्यात आले.गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
संघटनेचेचे अध्यक्ष संतोष गरुड,पंचायत समितीचे अधीक्षक एस. पी.मदने,श्रीमती मिठारे,श्रीमती पाटील श्रीमती राजश्री कोळी, श्रीमती एम.डी.खांडेकर शकील लतीफ,राजिवली मुलानी,शिवा मदभावी,चंदू कांबळे,मकरंद लवटे,बागुल आण्णा,अण्णाप्पा कांबळे,श्री मोहिते व सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.एम.डी. जेऊर सुत्र संचलन केले.
जत पंचायत समितीतील सीमेंट बाकड्यांचे लोकार्पण करण्यात आले.