बाजमध्ये‌ नवविवाहितेची गळपास घऊन आत्महत्या

0जत,प्रतिनिधी : बाज ता.जत‌ येथे नव विवाहितेने गळपास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारा घडली आहे.पुजा धनाजी काळे (वय 22,मुळ रा.अष्टविनायक नगर वारणाली सांगली,सध्या विजयनगरवाडी,बाज)असे‌ मयत‌ नवविवाहितेचे नाव आहे.याप्रकरणी जत‌ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,मुळ कवटेमहांकाळ येथे पुजा आई,भाव यांच्यासह राहत होती.21 जूलैला वारणाली सांगली येथील सीआयएसएफ मध्ये नोकरीस असलेल्या धनाजी काळे यांच्याशी पुजाचा विवाह झाला होता.पती धनाजी काळे सुट्टी संपल्यामुळे 12 ऑगस्ट 2020 ला छत्तीसगड येथे नोकरीस गेला होता.तेव्हापासून पुजा सांगली येथे माहेरी राहत होती.चार दिवसापुर्वी ती कवटेमहांकाळ येथे आईकडे आली होती.आज ता.1 ला विजयनगरवाडी बाज येथील पुजाचे मामा बाळू मुकिंदा गडदे यांच्याकडे आई,भाऊसह पुजा आली होती.मामा बाळू यांच्या घरापासून काही अंतरावर ऊसतोड सुरू असल्याने घरातील सर्वजण दुपारी 2 च्या सुमारास तिकडे गेले होते.याचा फायदा घेत पुजाने घरातील अँगलला गळपास लावून आत्महत्या केली.


Rate Card मामा व अन्य कुंटुबिय घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.तातडीने तिला खाली उतरवत जत‌ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ‌ आणण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तिला मत घोषित केले.डॉ.मोहिते यांनी जत‌ पोलीसात दिली.पोलीसांनी घटनास्थळी जात‌ पंचनामा केला आहे.अधिक तपास उपनिरिक्षक आप्पासाहेब कत्ते करत आहेत.पुजाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.