गुऱ्हाळघरांना अखेरची घरघर

0

शिराळा : शिराळ तालुक्यासह जिल्ह्यातील गुऱ्हाळाना आता आखेरची गरगर लागली आहे.गेल्या अनेक वर्षा पासून चालत आलेला गुऱ्हाळ व्यवसाय गुळाला दर नसल्याने बंद करण्याची वेळ आली आहे.कोल्हापुर आणी शिराळा तालुका गुळासाठी प्रसिद्ध आहे.येथील गुळाला एक वेगळीच चव आहे.प्रत्येक वर्षी अनेक ठीकाणी गुऱ्हाळे चालु असायची पण या वर्षी काही तुरळक ठिकाणी अपवाद पहाता सर्वच गुऱ्हाळ मालकांनी आपली गुऱ्हाळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.काही गुऱ्हाळ मालकांना विचारले असता गुळाला दर मिळत नाही.कामगार मिळत नाहीत, अगोदर 1 ते 2 लाख रूपये मजुरांना द्यावे लागतात तरी सुद्धा मजुर फसवतात. सरकार साखर कारखाण्यांना मदत करते,मग गुऱ्हाळघरांनाच हात का आखडते.अनुदान दिले नाही तरी चालेल पण, गुळाचे दर फिक्स केले असते,तर गरीब शेतकरी व गुऱ्हाळ मालक दोन्ही सुखी झाले असते.अश्या अनेक गुराळ मालकांच्या समस्या आहेत.सरसकट

गुऱ्हाळांना अनुदान देऊन व गुळ खरेदी करून सहकार्य करावे.


Rate Card

अन्यथा ही परस्थिती अशीच राहीली तर गुऱ्हाळ व्यावसाय कायमचे बंद होतील अशी खंत शेतकरी व गुऱ्हाळ मालक करत आहेत.कामगारांना सहा ते सात महिने अगोदर उचल देऊन देखिल कामगार ऐन गुऱ्हाळ सुरू होण्याच्या वेळेत फसवतात. कामगारांच्या हातापाया पडून कामावर आणावे लागते. त्यात वखारीत एकाच जातीच्या गुळाची चार कलमे अशाने शेतकरी आणि गुऱ्हाळ मालक दोघाचेही नुकसान होत आहे.त्यामुळे गुराळ घरांना सरकारने थोडाफार मदतीचा हात लावला तरच यापुढे गुऱ्हाळघरे दिसतील अन्यथा हा व्यावसायच पूर्ण बंद पडण्याची शक्यता अधिक वाटते.असे अनेक गुऱ्हाळ मालक सांगत आहेत.


 

परपरांगत सुरू असलेली गुऱ्हाळ घरे काळाच्या ओघात संपत आहेत.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.