जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बिळूर,बनाळी,दरिबडची या ठिकाणी शासकीय धान्यसाठा वाहून काळाबाजारात विक्री केला जाणार असलेच्या संशयावरुन पकडणेत आलेल्या वाहनांवर व वाहनाचे चालक मालकांवर जिवनावश्यक वस्तूची बेकायदेशिर वाहतुक केले जात असलेचे कारणास्तव गुन्हे दाखल करणेत आलेले आहेत. त्याबाबत वाहन चालक दुकानदार व सापडून आलेल्या वाहन परिसरातील रास्तभाव धान्य दुकानदारांची कसून चौकशी व तपासणी करुन संबंधीत दोषींवर कडक कारवाई करणेबाबतची प्रक्रिया महसूल व पुरवठा विभागाकडून करणेत येत,या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही,अशी माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविली आहे.
हेही वाचा…
जत पश्चिम भागात दुकानदारच पळवताहेत राशन | कोरोनाच्या काळात रेशनचा काळाबाजार ; 30 टक्के धान्ये गायब |
मागील पंधरा दिवसात जत तालुक्यातील एकूण तीन ठिकाणी बेकायदशिर धान्य वाहतूक करत असलेली वाहने ग्रामस्थांनी पोलीसांकरवी पकडून महसूल प्रशासनाला दिलेली आहेत.त्यामध्ये आढळून आलेला धान्य साठा शासकीय असलेचा सापडून आलेल्या गोणीवरुन निदर्शनास आलेला आहे. या प्रकरणी तालूक्यातील शासकीय धान्य दुकान चालवणारे परवानाधारक व दुकानाशी संबंधीत असणारे लोक पोलीसांनी ताब्यात घेतले,असून त्यांचेवर रितसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…
फिंगर मशीनची प्रिंट बंद पाडून रेशनकार्ड धारकांची लुट |
शिवाय त्यांची कसून चौकशी चालू आहे.तालूक्यातील जनतेच्या तक्रारीवरुन व ग्रामस्थांनीच रंगेहात वाहणे पकडून दिलेने सापडून आलेला धान्य माल हा रेशनींग लाभार्यांचा असलेचा व त्यांना धान्य माल न देता तो काळ्या बाजारात बेमालूम विक्री केले जात असलेच्या तक्रारीच्या अनुशंगाने बिळूर,बनाळी,डफळापूर,दरिबडची येथील दुकानांच्या कसून चौकशी व तपासणी महसूलच्या अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाकडून तातडीने करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालयास पाठवणेत येत आहे.या प्रकरणी दोषीं रेशन दुकानदारांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसून त्यांचेवर कडक कारवाई होणेबाबत वरीष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला जात आहे. असे तहसिलदार पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा…
जतच्या पुरवठा अधिकाऱ्याला बडतर्फ करा ; संजय कांबळे |
तरी तालुक्यातील योजनापात्र लाभार्थी यांनी रास्त भाव धान्य दुकानदाराकडून पॉस मशिनव्दारे धान्य खरेदी केलेनंतर रोखीची पावती घ्यावी. व पावतीनुसार होणारी रक्कमच दुकानदारास दयावी. दुकानदार पावती देणेस टाळाटाळ व नकार देत असलेस त्याबाबतची लेखी तकार ग्रामस्तरावरील दक्षता कमीटी अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव तलाठी यांचेकडे करणेत यावी.
धान्य वितरण प्रणाली बाबत माहिती देताना श्री पाटील यांनी नमुद केले आहे की, तालूक्यातील जे अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजना लाभार्थी आहेत व ज्यांचे नावाची पॉस मशिनवर 12 अंकी नंबरने नोंद आहेत.अशा पात्र शिधापत्रिका धारकांस कार्डातील एका सदस्याचा पॉस मशिनवर अंगठा लावून सदर योजनांचा लाभ दिला जात असतो.ऑनलाईन वितरणप्रणाली आधारसिडींग निगडीत असलेने शिधापत्रिकांतील सर्व सदस्यांचे आधारकार्ड पॉस मशिनला जोडणी करणे अत्यावश्यक असलेने ज्या योजनापात्र शिधापत्रिकांतील लाभार्थ्यांनी अद्यापी आधारकार्ड जोडणीसाठी दुकानदारांकडे दिलेले नाही त्यांनी ते तात्काळ देणेची कार्यवाही करावी.
हेही वाचा…
रेशनच्या काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्याला पुरवठा विभागाचेच बळ ? |
स्वस्त धान्य दुकानदाराकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकामधील प्रति व्यक्ती 3 किलो गहू दर रु.2/- तर प्रति व्यक्ती 2 किलो तांदळ दर 3 रु./- असे मिळून पाच किलो धान्य प्रति व्यक्ती देय आहे. तर अंत्योदय योजनाअंतर्गत प्रति कार्ड धारकांस गहू 25 किलो व तांदुळ 10 किलो असा मिळून 35 किलो धान्य आणि प्रति अंत्योदय कार्ड धारकांस 1 किलो साखर किंमत रु.20/- देय आहे.या नियोजित प्रमाण व दरापेक्षा जास्त व कमी प्रमाण व दर परस्पर दुकानदारांकडून आकारणे बेकायदेशिर आहे. तसे आढळलेस किंवा तशी तक्रार लाभार्थ्यांकडून ग्राम दक्षता समिती किंवा तहसिल कार्यालयास प्राप्त होताच त्याची गंभीर दखल घेवून सखोल चौकशीअंती दोषी रास्तभाव धान्य दुकानाविरोधात जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 दुरुस्ती आदेश 2013 नुसार कडक कारवाई करणेकरीताचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास सादर करणेची कार्यवाही केली जाते असे या पत्रकाव्दारे जत तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिध्द केले आहे.
संकेत टाइम्सच्या मालिकेची दखल
जत तालुक्यात सुरू असलेल्या गरिबाच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा प्रर्दापाश गेल्या चार दिवसापासून संकेत टाइम्स मधून वस्तूनिष्ठ वृत्ताद्वारे करण्यात येत आहे. त्यांची गंभीर दखल घेत अखेर तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने कारवाईबाबत स्वतंत्र पत्रक काढून कारवाईची माहिती दिली आहे.