जतच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट | अधिकाऱ्यांनीच पोसले दलाल
जत,प्रतिनिधी : जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या अनेक दिवसापासून सावळा गोंधळ सुरू आहे.शेतकरी व खरेदी विक्री करणार्या धारकांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात दलालांमार्फत आर्थिक लूट होत आहे.त्यामुळे हे दुय्यम निबंधक कार्यालय आहे आहे की दलालांचे कार्यालय आहे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वरिष्ठ अधिकारीच यात गुंतल्याने दलाल सैराट झाले असून कार्यालय त्यांनी ताब्यात घेतल्याचे चित्र आहे.प्रत्येक खरेदी अथवा विक्रीसाठी त्यांच्या सोबत अधिकाऱ्यांनी पोसलेला दलाल असतोच असे काहीसे चित्र जतच्या दुय्यम निंबधक कार्यालयात आहे.येथे लुटीचे आकडे हाजारोतून लाखोकडे पोहचत आहेत.

खरेदी-विक्री करणार्या शेतकरी व इतर यांना आपल्या खरेदी व्यवहारासाठी रात्रीच्या वेळेस मुक्कामी राहण्याची वेळ येत आहे यामुळे मात्र शेतकरी व सर्वसामान्यांना कमालीचा त्रास होत आहे.दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या कित्येक दिवसापासून सावळा गोंधळ सुरू आहे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असताना आर्थिक देवाण-घेवाण च्या माध्यमातून हे व्यवहार होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे मात्र संबंधित अधिकार्यावर वरिष्ठ अधिकार्यांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही आपल्या मालमत्तेची खरेदी अथवा विक्री करताना दलाला मार्फतच व्यवहार करावे लागतात.
नंबर लावण्यासाठी जर एखाद्याला पैसे दिले तर त्या वेळेसच खरेदी-विक्रीचा नंबर लागतो जर दलालामार्फत पैसे दिले नाहीत तर शेतकरी व सर्वसामान्यांना आठवडाभर नंबर लागण्याची वाट पहावी लागते सध्या कोरोनाव्हायरस ने थैमान घातले आहे.गोरगरीब नागरिक शेतकरी वर्ग कमालीचा हैराण आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शेतकरी व सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात दलालामार्फत आर्थिक लूट होत आहे दरम्यान या दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी व सर्वसामान्यांची दलालामार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे दलालामार्फत व्यवहार केले. जातात या ठिकाणी असलेले कर्मचारी जाणीवपूर्वक खरेदी विक्रीचे सर्व कागदपत्र दलालाकडे पाठवतात व आर्थिक व्यवहार ठरल्यानंतर त्या व्यक्तीचाच नंबर लावतात गोरगरिबांचे मात्र हाल होत आहेत हा प्रकार अनेकदा उघडकीस येऊनही वरिष्ठ अधिकारी यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.