लॉकडाऊमधील वीजबील माफ करा

0सांगली : लॉकडाऊनमुळे सर्व गरीब जनतेचे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे. संपूर्ण वीज बिल माफी शक्य नसल्यास 50 टक्केच वीज बिल आकारणी करावी,अशी मागणी सांगली जिल्हा रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे.सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ता.25 नोव्हेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदने देत आंदोलन करण्यात येणार आहे.
लॉकडाउनमुळे सामान्य गरीब वर्ग संकटात सापडला आहे. त्याला वीज बिल माफी मिळायला हवी.ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत आहेत.त्यामुळे

संपुर्ण वीज बिल माफ करावे.तसेच पुढील चार महिने थकबाकीमुळे कोणाचीही वीज तोडणी करू नये, अशी सूचनाही निवेदनाद्वाे माहवितरण वीज कंपनीला केली आहे.
Rate Card

यावेळी प्रदेश सचिव विवेक कांबळे,सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे,जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,राजेश तिरमारे,अशोक कांबळे,छायाताई सरवदे,सचिन सव्वाखंडे,योगेंद्र कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विज बिल माफ कराच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.