जतेत धान्याचा काळाबाजार सुरुच | कारवाई नंतरही दुकानदाराची मुजोरी कायम,पावत्या गायब

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे बिळूर,बनाळी व दरिबडची येथील स्वस्तधान्य दुकानातून काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी जात असलेल्या वाहनावर गुन्हे दाखल  करण्यात आले असलेतरी याच्या पाठीशी कोण आहे.याचा तपास करण्याची वेळ आली असून अशा प्रवृत्तीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटनाकडून करण्यात येत आहे.

जत पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे व तालुक्यातील स्वस्तधान्य  दुकानदार यांच्याशी असलेले लागेबांधे यामुळे तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदार हे शेफारले असून ते स्वस्तधान्य दुकानासाठी गोरगरिबांना मिळणारे गहू व तांदूळ हे स्वस्तधान्य जणू काय आपल्या बापाचाच माल आहे अशा अविर्भावात हा माल काळ्याबाजारात विक्री करत आहेत.शासनाने पुरवठा विभागाचे माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात गहू,तांदूळ आदी धान्याचा घरोघरी पुरवठा व्हावा यासाठी स्वस्तधान्य दुकाने चालू केली आहेत. 

परंतु बहुतांशी स्वस्तधान्य दुकानदार हे शासकीय गोदामातून आपले दुकानात माल आल्यानंतर ते शिधापत्रिका धारकांना वाटप न करता ते धान्य काळ्याबाजारात विक्री करतात. ज्या स्वस्तात मिळणारे गहू व तांदूळ या धान्यावर गोरगरिब लोकांचा अधिकार आहे. हे स्वस्तधान्य दुकानातून मिळणारे धान्य त्यांच्या रोजी रोटीचा व चरितार्थाचा एक भाग आहे तेच धान्य हे वरकमाईला सोकलेले स्वस्तधान्य दुकानदार काळ्याबाजारात विकून गोरगरिब लोकांच्या तोंडचा घास काढून घेत आहेत. 
Rate Card
बहुतांशी स्वस्तधान्य दुकानदार हे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप न करता पुरवठा विभागातील हप्तेखोरीला चटावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून स्वस्तधान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केल्याचे रेकॉर्ड कागदोपत्री दाखवून स्वस्तधान्याचा काळाबाजार करित आहेत.हा प्रकार वर्षानुवर्ष सुरू असून या प्रकाराला सर्वस्वी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हेच जबाबदार आहेत. कारण जत तालुक्यात पंधरादिवसात बिळूर,बनाळी व दरिबडची येथील स्वस्तधान्य दुकानातून काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी जात असलेल्या वाहनावर व सबंधित काळाबाजार करणारे यांच्यावर गुन्हे दाखल होतात हे कशामुळे याचा तपास जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी केला पाहिजे.त्याचप्रमाणे गोरगरिबांना पुरवठा होत असलेले स्वस्तधान्य हे आजपर्यंत कोणी कोणी काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी नेले याचा तपास होवून अशा गरिबांच्या तोंडचे अन्न काढून घेणारे स्वस्तधान्य दुकानदार यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द केले पाहीजेत अशी अपेक्षा ही सामाजिक संघटनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.