दरिबडतील स्वस्तधान्य दुकानदारावर गुन्हा दाखल

0संख,वार्ताहर : जत तालुक्यातील दरिबडची येथे रेशनच्या धान्याचे काळाबाजार करू पाहणाऱ्या रेशन दुकानदारास शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी धान्य भरलेल्या टाटा सफारीसह रंगेहात पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले होते.रात्री उशिरापर्यत चाललेल्या या कारवाईत 50 किलो वजनाची 23 पोती धान्य,टाटा सफारी गाडी जप्त करत संबधित दुकानदारावर जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धान्य लादलेले वाहनही दुकानदाराच्या मालकीचेच असून वाहन क्र. MH 10 BA 7188 हे वाहन जप्त करण्यात आले आहे. रात्री उशिरा पंचनाम्याची प्रक्रिया करून माल भरलेल्या  वाहनाची जत तहसील येथे रवानगी करण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानदार आनंदराव आप्पासो पाटील हे आपल्या मालकीच्या टाटा सफारी वाहनामध्ये शनिवारी रात्री रेशनचे धान्य लादून घेऊन जाताना गावातील काही नागरिकांच्या लक्षात आले.संशय आल्याने नागरिकांनी वाहन अडवून सदरची बातमी संख अप्पर तहसीलदार यांना कळविली.घटनास्थळी आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी सदरचे वाहन संख येथे नेऊन रीतसर पंचनामा केला.वाहनामध्ये 50 किलो वजनाचे 23 पोती धान्य आढळून आले.रात्री उशिरा पंचनामा करून जत तहसीलदार सचिन पाटील याच्या ताब्यात वाहन देण्यात आले. याबाबत जत पोलीस ठाण्यात दुकानदारावर गुन्हा नोंद करण्यात आले असल्याचे जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.Rate Card

जत पुर्व भागातील धान्य दुकानादाराचे प्रताप सातत्याने समोर येत आहेत.तरीही 

महसूल प्रशासन गंभीरता घेत नाही.प्रत्येक गावात,तलाठी,कोतवाल,गटमध्ये मंडल अधिकारी,पुरवठा विभाग अशी तगडी यंत्रणा असतानाही धान्य दुकानावर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत आहे.परिणामी गरीबाचे धान्य लुटणारी रेशन दुकानदारीची टोळी तयार झाली असून दररोज मध्यरात्री शेकडो पोती धान्ये कर्नाटकातील काळ्या बाजारात जात आहे.संख येथे पंचनामा करताना यावेळी जतचे तहसिलदार सचिन पाटील,नायबतहसिलदार डी.पी.माळी ,मंडळ अधिकारी सुभाष कोळी,तलाठी एस.डी.बागेळी,तलाठी एन.डी.सांगोलकर,तलाठी आर.एस.चाचे,आर.टी.वालकोळी,क्लर्क नितीन शिंगाडे उपस्थित होते.दरिबडची येथे टाटा सफारी गाडीतून जप्त केलेले तब्बल 23 पोती धान्य

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.