शेगावमध्ये दीड लाखाचे चंदन जप्त | जत तालुकाभरातील बेसुमार चंदन तस्करीला कोणाचे बळ

0



जत,प्रतिनिधी : शेगाव ता.जत येथे चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघा चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना जत पोलीसांनी ताब्यात घेतले.त्याच्याकडे चंदनाचे दोन तुकडे,दुचाकी असा एक लाख 49 हजार 90 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी राजू चन्नाप्पा भोसले (वय 32,रा.पंढरपूर),सिताराम बळिराम चंदनवाले(वय 19,रा.रोपळे ता.पंढरपूर)यांना ताब्यात घेतले आहे.








अधिक माहिती अशी,

शेगाव स्टँडनजिक दोन चंदन तस्कर चंदनाचे तुकडे विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार जत पोलीसाच्या पथकाने सापळा लावून त्यांना दुचाकीसह ताब्यात घेतले.त्यात 52,850 रूपये किंमतीचे 15 किलो 100 ग्रँम,व 66,150 रूपयाचे 18 किलो 900 ग्रम असे सुंगधी वासाचे दोन चंदनाचे ओबड,धोबड तुकडे आढळून आले.त्याचबरोबर 30 हजार रूपये किंमतीची होडा शाईन दुचाकी (एम एच 13,बीवाय 7805),एक कुऱ्हाड,एक वाकस असे 1 लाख, 49 हजार,90 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.




Rate Card




दरम्यान अवैध धंदे बंद केल्याचे सांगणाऱ्या अधिकारी यामुळे उघड्यावर पडले असून तालुकाभर चंदन तस्करांनी धुमाकुळ घातला आहे.दिवसाढवळ्या चंदनाची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे.किरकोळ कारवाई करून पोलीस आपलीच पाठ थोपटून घेत असल्याचे आरोप होत आहेत.तालुक्यात आलेल्या नव्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण सुटल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.








चंदन,गांज्या,मटका,जुगार,सावकारी बेधडक सुरू असताना अवैध धंदे बंद असल्याचा कांगावा करणाऱ्यांच्या गेल्या काही दिवसातील गांज्या,चंदन तस्करी डोळ्यात अंजन घातले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.