जत,प्रतिनिधी : रेशन दुकानाचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेहणाऱ्या पिक अप टेंपोसह 90 हजार रूपये किंमतीची 60 पोती तांदूळ जप्त करत तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी प्रमोद उत्तम संकपाळ (वय 28), बसवराज विरूपाक्ष शेटे (वय 35,दोघे रा. डफळापूर) तसेच किशोर भानुदास देवकुळे तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे जत पोलीसांच्या रात्रीच्या गस्त पथकाला बनाळी शाळेनजिक एक पिकअप टेम्पो(एम एच 10,बीआर 4265) संशयित आढळून आल्याने टेम्पोला थांबवत पाहणी केली असता त्यात स्वस्त धान्य दुकानातील सुमारे 90 हजार रूपये किंमतीचा 60 पोती तांदुळ आढळून आला.
तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेहण्यात येत असल्याचा संशय आल्याने पिकअपसह त्यातील तिघांना पोलीसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात पोलिस नाईक बजरंग थोरात यांनी फिर्याद दिली आहे.अधिक तपास उपनिरिक्षक आप्पासाहेब कत्ते करत आहेत.