विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग अजूनही धोकादायक !

0
12

जत,प्रतिनिधी : गुहागर-विजापूर महामार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून या महामार्गावर आतापर्यंत कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. मात्र , अजूनही धोकादायक वळणाचाच हा महामार्ग असून वाहनचालकाना त्याचा त्रास होणार आहे. तसेच मोठ्या अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता आहे.







अपघातांची संख्या कमी करण्यासाठी 

विजापूर-गुहागर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र , सध्या त्याउलट स्थिती पहायला मिळत आहे.


सध्या या महामार्गाच्या दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी या कामाला मंजूर आहे . मात्र या रस्त्यावरील धोकादायक वळणे काढली गेली नाहीत. ही गंभीर बाब आहे.वळणे काढण्यासाठी काही जमीन अधिग्रहित करणे आवश्यक होती. ती अधिग्रहित करण्यात आलेली नाही. आता दुहेरीकरणाने महामार्ग वेगवान झाला तरी अनेक वळणे पूर्वीप्रमाणेच असल्याने ती धोकादायक ठरणार आहेत.









प्रत्यक्षात महामार्गाचे काम पूर्ण व्हायला आले आहे. तरी कामाची सद्यस्थिती बघितल्यास धोकादायक वळणे तशीच आहेत. काही वळणे अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागणार आहे.महामार्ग दुहेरीकरणाच्या कामाच्यावेळी वळणे काढली जातील अशी अपेक्षा होती. मात्र, ती तशीच ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.या महामार्गावरून आता वर्दळ वाढणार आहे.ती वळणावर जीवघेणी ठरण्याची दाट शक्यता वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.





विजापूर-गुहागर महामार्ग अरुंद व वळणा वळणाचा असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असत. त्यामुळे या महामार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पण अजूनही अपघातांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. याउलट निकृष्ट काम,वळणाच्या महामार्गामुळे तो मृत्यूचा सापळा बनू नये. एवढीच आमची अपेक्षा आहे.
 

-विक्रम ढोणे,युवा नेते

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here