करजगीत शेतमजूराची गळपासाने आत्महत्या

0



करजगी,वार्ताहर : करजगीत मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मढीवाळप्पा पराप्पा तिकोटी(वय 50)असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.









अधिक माहिती अशी,मढीवाळप्पा तिकोटी हे मागील दहा वर्षापासून वाळवा मध्ये मजुरी करतात,तेथेच पत्नी,दोन मुले असे कुंटुबासह राहतात.गेल्या आठ दिवसापुर्वी ते दीपावलीसाठी म्हणून करजगी या मुळगावी आले होते.





Rate Card




गुरूवारी गावाशेजारी असलेल्या रुद्रप्पा अक्कलकोट यांच्या शेतात मढीवाळप्पा यांचा लिंबाच्या झाडाला गळफास लावलेला संशयास्पद मृत्तदेह आढळून आला.घटनेने गावात एकच खळबळ आहे.









 रुद्राप्पा अक्कलकोट यांनी उमदी पोलीस ठाणे वर्दी दिली आहे. घटनास्थळी उमदी ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव दांडगे,बीट हवालदार नितीन पलुसकर यांनी मृत्तदेह खाली उतरवत,उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.पुढील तपास नितीन पलुसकर करत आहे.




shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.