फटाक्यांची विक्रीत मोठी घटकोरोनाचा फटका,विक्री 50 टक्यावर

0
9



जत,प्रतिनिधी : दिवाळी चालू होऊन दिवसांवर झाले तरीही फटाके बाजारात उलाढाल थंडावली आहे.फटाके बाजारातील उलाढालीवर यंदा कोरोनाचे सावट दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 50 टक्के कमी विक्री होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कोरोनाचा फटका विविध क्षेत्रांना बसला आहे. 







फटाके बाजारही त्यातून सुटलेला नाही. शहरात फटाके विक्री करणारे अनेक अधिकृत विक्रेते आहेत. तर अनेक जण दिवाळीच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून तात्पुरती परवानगी घेऊन फटाक्यांची विक्री करतात. मात्र घाऊक विक्रेत्यांप्रमाणेच किरकोळ विक्रेत्यांमध्येही निराशा दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणात आगाऊ नोंदणी करायचे यंदा मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे घाऊक विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.






तसेच मागील वर्षी दिवाळीच्या वेळी जोरदार पाऊस जिल्ह्यात झाला होता. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे मागील वर्षाचे फटाके तसेच पडून आहेत. दिवाळीच्या काही दिवस आधी घाऊक विक्रेत्यांकडील फटाक्यांची विक्री सुरु होते. त्यानंतर किरकोळ विक्रेते विक्री करतात. मागील वर्षी आमची विक्री पूर्ण झाली होती मात्र दिवाळीच्या काळात मुळे किरकोळ विक्रेत्यांकडे 50 टक्के फटाके पडून आहेत.म्हणून त्यांनी यंदा फटाके कमी प्रमाणात घेणार असल्याचे सांगितले होते असे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील बहुतेक घाऊक विक्रेत्यांनी नेहमीपेक्षा 50 टक्के कमी फटाके मागवले आहेत.







आणि त्यातच कोरोनाचा फटका विक्रेत्यांना बसला आहे.जत बाजार समितीच्या डांळीब मार्केट हॉलमध्ये तात्पुर्ते फटाक्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत.मात्र दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.एकादे दुसरे ग्राहक फटाके घेताना दिसत होते.कोरोनाचा व फटाके बंदीचा फटका येथे बसल्याचे जाणवत आहे.







जत बाजार समितीच्या आवारात लावण्यात आलेला फटाक्याचे स्टॉल

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here