जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गेल्या वर्षभरात जत तालुक्यात झालेल्या रस्ते कामावर खर्च झालेला सुमारे पंचवीस कोटीचा निधी नव्या रस्त्यावर बेसुमार खड्डे पडल्याने वाया गेला आहे.जत तालुक्यात गत भाजपा सरकार काळात तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांच्या काळात मोठ्या प्रमाणात रस्ते कामासाठी निधी आला होता.देश स्वतंत्र झाल्यापासून कच्चे असलेले अनेक रस्ते यामुळे डांबरीकरणाचे झाले आहेत.
त्यानंतर गत वर्षभरात विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक नवे रस्ते करण्यात आले आहेत.भल्या मोठ्या तालुक्यातील रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अनेक कोटीचा निधी आला आहे.मात्र वर्षभरात नव्याने झालेल्या रस्ते राजकीय आणि सरकारी अनास्थेचा बळी ठरत असून सर्वाच्या सोयीस्कर दुर्लक्षाने रस्ते कामासाठी खर्च झालेला कोट्यावधीचा निधी वर्षभरात अधिकारी,ठेकेदारांच्या भ्रष्ट साखळीने वाया घालवला आहे.तालुक्यात मोठ्या संख्येने चकाचक झालेल्या डांबरीकरणाच्या रस्त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते.मात्र ते ओटघटकेचे ठरले आहे.नवे रस्ते काही महिन्यात खड्डेमय झाले आहेत.
गेल्या वर्षभरात केलेल्या तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर ‘ रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता ‘ हेच समजून येत नाही. अनेक रस्ते धोकादायक स्थितीत असून दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे.शहरातील रस्त्यांबरोबरच गावागावातील रस्त्याची स्थितीही बिकट आहे.डफळापूर-अंनतपूर,डफळापूर-जि
मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मूग गिळून गप्प आहे.जनतेतून या समस्येबाबत उठाव झाला आणि आंदोलन झाले की,प्रशासकीय यंत्रणा जागी होते. त्यानंतर काम हाती घेतले जाते. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत मे महिना उजाडतो. पावसाळा सुरू झाला की केलेला रस्ता वाहून जातो अथवा रस्त्यावर मोठे खड्डे तरी पडतात.परिणामी रस्त्यासाठी आलेला कोट्यावधीचा निधी भष्ट्र साखळी गिंळकृत करत आहे.प्रमुख शहरांसह महामार्गाची अवस्था देखील अनेक ठिकाणी बिकट झाली असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.रस्ते बांधकामानंतर एक पाऊस देखील रस्ते पेलू शकले नसल्याचे अनेकवेळा दिसून येते.
शहरांचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो. रस्त्यांवरून होणारी वाहतूक ही सुरळीत आणि जास्त वेगाने होणे गरजेचे आहे. तर विकासाला गती मिळते. परंतु , सध्या रस्तेच खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे एकप्रकारे विकासाला खीळ बसत आहे. त्यातच रस्ते खड्डेमय असल्याने नियमित दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना पाठ, मान, कंबरदुखी बरोबरच मणक्याचे आजार जडले आहेत.त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संतापाचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या समस्येकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
जत तालुक्यातील रस्त्याची अवस्था सर्वांची आनास्था स्पष्ट करत आहेत.