अंतराळातील तिसरा डोळा

0
3



भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने ईओएस 01 अर्थ ऑब्झर्वेशन  या सॅटेलाइट लॉन्चरचे यशस्वी प्रेसक्षण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोने याआधी अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत पण या मोहिमेचे वैशिष्ट्ये खूप वेगळे आहे. कोरोनाच्या काळात  संपूर्ण जग वर्क फ्रॉम होम करीत असताना इस्रोचे शास्त्रज्ञ मात्र घरुन काम न करता प्रत्यक्ष लॅबमध्ये जाऊन या सॅटेलाईटच्या प्रेक्षपणासाठी दिवस रात्र मेहनत करीत होते.







इस्रोच्या शास्त्रज्ञांना वर्क फ्रॉम होमची परवानगी नसल्याने ते लॅबमध्ये जाऊन सुरक्षेचे सर्व नियम पाळून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटत होते. कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीतही देशाच्या सुरक्षेसाठी हे शास्त्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत होते त्यांच्या मेहमतीचे फळ म्हणजे या मोहिमेची यशस्वी सांगता. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे यासाठी जितके कौतुक करावे तितके कमी आहे. ईओएस 01अर्थ ऑब्झर्वेशन हे सॅटेलाइट भारतासाठी खूप महत्वाचे आहे.







कारण हे सॅटेलाईट भारतासाठी अंतराळातील  तिसरा डोळा ठरणार आहे. पाकिस्तान, चीन हे आपले सख्खे शेजारी पण पक्के वैरी असलेले देश सतत भारताविरुद्ध काहीना काही कारवाया करीत असतात. त्यांच्या सीमा आपल्या सीमेला लागूनच असल्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असतात. ते जरी शेजारी असले तरी त्यांच्या सीमा उंच बर्फाळ डोंगर रांगेत असल्याने सीमेपलीकडे ते काय  करीत आहे हे समजण्यास अडचणी येत होत्या. पाकिस्तानात तर दहशतवादी अड्डे आहेत हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात.







 या दहशतवाद्यांच्या दहशतवादी कृत्यांवर तसेच चीन, पाकिस्तान या शत्रू राष्ट्रांच्या सीमेवरील कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी हाय रिझोल्युशनची सुविधा असणाऱ्या सॅटेलाईटची देशाला गरज होती. ईओएस 01अर्थ ऑब्झर्वेशन हे सॅटेलाईट शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल. याच्या सिंथेटिक अपचर्च रडारच्या माध्यमातून दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही आणि कोणत्याही हंगामात शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हा सॅटेलाईट ढगांचा अडथळ्यांना भेदून हाय रिझोल्युशनचे फोटो घेण्यास सक्षम आहे. 







या सॅटेलाईटमुळे शत्रू सैन्यावर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. त्याचबरोबर कृषी, वने, भूविज्ञान या क्षेत्रात तसेच किनारी भागांतील सुरक्षा मजबूत करण्यासाठीही या सॅटेलाईटचा उपयोग होणार आहे  त्यामुळे लष्कराच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. पाकिस्तानसोबत आता चीनच्या कुरापतीही भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे या पार्श्वभूमीवर  हा सॅटेलाईट भारतासाठी अनेक अर्थाने फायदेशीर ठरणार आहे.







हा सॅटेलाईट भारतासाठी अंतराळातील तिसरा डोळा ठरणार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सॅटेलाईटचे यशस्वी प्रेक्षपण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन व आभार! त्यांच्या या कामगिरीने देशाची छाती अभिमानाने फुगली आहे. 



श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 
9922546295 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here