जत‌ दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांकाची लुट

0जत,प्रतिनिधी : जत दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त लेखनिक यांच्याकडून पक्षकारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक सुरू असून यामुळे परवानाधारक दस्त लेखनिक यांच्यावर अन्याय होत आहे.या प्रकाराला सर्वस्वी जतचे दुय्यम निबंधकच जबाबदार असून याची सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली यांनी चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष मौलाली मणेर यानी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे केली आहे. मौलाली मणेर यानी म्हंटले आहे की, जत दुय्यम निबंधक कार्यालयात पंधरा मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक आहेत.सध्य परिस्थितीत अधिकृत व परवानाधारक दस्त लेखनिक हे दोनच आहेत. दस्त लेखनिक यांना दस्त लिखाईचा परवाना असतो. तो दरवर्षी शासनाची फि भरून सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून नूतनीकरण करून घ्यावा लागतो.दस्त लेखनिक यानीच दस्त तयार करून ते दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी कामी हजर करणे हे दस्त लेखनिक यांचे काम असताना जत दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र बहुतांशी मुद्रांक विक्रेते व मोठ्या प्रमाणावर  कार्यालयाशी सबंधित असलेल्या बोगस व्यक्ती या दस्त लेखनिक म्हणून काम करित आहेत. हे बोगस दस्त लेखनिक यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा दस्त लेखनिक परवाना नसताना केवळ दुय्यम निबंधक यांना हाताशी धरून ते दलालामार्फत आलेल्या पक्षकारांना मी दुय्यम निबंधक यांच्या मर्जीतला व्यक्ती असून दुय्यम निबंधक हे माझे काम लगेच करतात असे सांगून असे दलालाकडून आलेले पक्षकार यांची दिशाभूल करून दस्त लेखनिकाचे काम करित आहेत.हे बोगस दस्त लेखनिक त्यांना मिळणारे पैशातून दुय्यम निबंधक यांची व कार्यालयीन कर्मचारी यांची चांगल्या प्रकारे खातीरदारी करित असल्याने परवानाधारक दस्त लेखनिक यांच्या ऐवजी दुय्यम निबंधक हे अशा खातीरदारी करणारे बोगस दस्त लेखनिक यांच्याशी जवळीक साधताना दिसत आहेत.त्यातच हे बोगस दस्त तयार करणारे लोक आपल्याच मर्जीतील मुद्रांक विक्रेते यांना हाताशी धरून दस्तावर त्यांचा दस्तुर बांधून त्यांना त्याचा अल्प मोबदला देऊन त्यांनाही यामध्ये सामील करून घेत आहेत.  त्यामुळे हे बोगस दस्त लेखनिक दुय्यम निबंधक यांच्या गळ्यातील ताईत बनले असून दुय्यम निबंधक हे या बोगस दस्त लेखनिकांच्याकडून आलेल्या कामाला प्रथम प्राधान्य देत आहेत. 

जत दुय्यम निबंधक कार्यालयात असलेल्या अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्या पेक्षा या बोगस दस्त लेखनिकांची दररोजची कमाई मोठी आहे. 
Rate Card
हे बोगस दस्त लेखनिक स्वताला अधिकृत दस्तलेखनिक समजत असून तसे ते वागत आहेत.या सर्व प्रकाराची दुय्यम निबंधक यांना पूर्ण कल्पना असतानाही ते या बोगस लोकांकडून आपली चांगल्या प्रकारे खातीरदारी होत असल्याने त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.जत दुय्यम निबंधक कार्यालयात कोणत्याही नोंदणीकृत दस्त ऐवजाला लागणारे दस्तासाठीची मुद्रांक फी व नोंदणी फी ही ई चलनाने सबंधित पक्षकारांनी भरल्यानंतर ही दुय्यम निबंधक यांना पावतीचे पैसे देण्याचे नावाखाली हे दस्तलेखनिक कसले पैसे घेतात याचीही सविस्तर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ही पक्षकारांकडून करण्यात येत आहे.
 तसेच जत दुय्यम निबंधक कार्यालयातील बहुतांशी मुद्रांक विक्रेते हे पक्षकारांना शंभर व पाचशे रूपयांचे स्टॅम्प देताना वर दहा दहा रूपये जादा घेतात. तसेच पक्षकारांशी उद्धट वर्तन करताना. या मुद्रांक विक्रेते यांच्यासमोर तासतासभर थांबून ही ते स्टॅम्प देण्यास टाळाटाळ करतात. मुद्रांक विक्री साठा रोजच्यारोज फलकावर लावणे बंधनकारक असताना ही ते मुद्रांकाचा साठा बोर्डवर लिहीत नाहीत याचीही चौकशी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली यांनी करावी अशी मागणी ही मणेर यानी केली आहे. 


    

जत पुर्व भागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करा


जत पूर्व भागातील लोकांना व पक्षकारांना जतचे दुय्यम निबंधक कार्यालयाचे अंतर व गैरसोईचे होत असल्याने ते संख अप्पर तहसिल कार्यालय या ठिकाणी हलविण्यात यावे व पूर्व भागातील चार मंडल विभागातील व 67 गावातील लोकांना न्याय द्यावा अशी मागणी ही मणेर यानी केली आहे. 


   

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.