करजगी,वार्ताहर : श्री जिन्नेसाहेब देवाची यात्रेनिमित्त करजगीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन श्री.वेदमूर्ती धानय्या हिरेमठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.दोनशे रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.करजगी येथील डॉ.सचिन बालगाव यांच्या शिवकृपा हॉस्पिटल मध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुरव,आर्थो पेडिक तज्ञ मकसूद तांबोळी,लहान मुलांची तज्ञ डॉ.विद्याधर पाटील,दन्त तज्ञ डॉ.आय.एम.तांबोळी,डॉ.जगदीश माळी, डॉ.बशीर बिराजदार उपस्थित होते.या
शिबीरात परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती.यावेळी विविध आजाराची तपासणी,प्राथमिक उपचार,मोफत औषधाचे वाटप करण्यात आले.
औषध,गोळ्यासाठी राजकुमार कपले (वरमहालक्ष्मी फार्मा डिस्ट्रीब्युटर्स),मोफत रक्त लघवी तपासणी जीवन सवदी(बसवा लॅब),तर सहकार्य दिलीप गडदे (गडदे मेडिकल करजगी) यांचे लाभले.शिबीराचे आयोजन शिवकृपा हास्पिटल यांच्या वतीने करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते आसिफभाई जागीरदार,संरपच साहेबपाशा बिराजदार,धानय्या हिरेमठ,सुभाष बालगावं, राजू तेली,चन्नबसु बगली,शिवनिंगाप्पा बगली,
लक्ष्मण अंकलगी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप धरेप्पा कट्टीमनी यांनी केली.
करजगी ता.जत येथे आरोग्य शिबीरात उपस्थित डॉक्टर्स,व मान्यवर