डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ते बाज या महावितरण कार्यालया समोरून जाणाऱ्या रस्त्याचे काम दर्जाहीन झाले असून सहा महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी रस्ता दबला असून पुढील काही महिन्यात डांबरीकरण संपूर्ण उखडून रस्ता खड्डेमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेक वर्षाच्या मागणीनंतर डफळापूर महावितरण कार्यालया समोरून बेंळूखी मळा भाग,व पुढे बाज,धावडवाडीपर्यत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्ता करताना खाली मजबूत मुरमीकरण करण्यात आलेले नाही.अनेक वेळा याबाबत संबधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी रस्त्याचे काम सहा महिन्यात उखडून खड्डे पडू लागलेत.डफळापूर पासून बाजपर्यतच्या या डांबरीकरणाचे मुलामा लावलेल्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत.
त्याशिवाय रस्ता अनेक ठिकाणी दबला आहे.पुढील काही महिन्यात अवजड ऊसाची ट्रँक्टरची वाहतूक सुरू झाल्यानंतर रस्त्याची वाट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सहा महिन्यापुर्वी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्ता कामाची चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.
डफळापूर ते बाज रस्त्यावर सहा महिन्यात खड्डे पडले आहेत.