25 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन करण्याचे आपले उद्दिष्ट : ना.जयंत पाटील

0
6





इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तीनही युनिटचा गळीत हंगाम शुभारंभ आज करण्यात आला. कोरोनाच्या या कठीण कळत आपण आपल्या जिवाभावाची लोकं गमावली आहेत. तोडणी करिता येणार्‍या मजुरांच्या आरोग्याची काळजी घेत यंदाचा हंगाम सुरू होत आहे.मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत शेतकरी ऊसाची लागवड करतात. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते आणि अतिरिक्त साखर साठाही तयार होतो.







इथनॉल इंधन निर्मिती हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. बहुउद्देशीय अशा ऊस उत्पादनासाठी सरकार शेतकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणार आहे. सध्या साखरेचा साठा जास्त असल्याने साखरेला हवा तेवढा भाव नाही. मात्र यावर लवकरच मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने 10 हजार कोटीपेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला. लवकरच या निर्णयाची देखील अंमलबजावणी केली जाईल.







यंदाचा हंगाम सर्वात चांगला हंगाम व्हावा यासाठी साखर कारखाना प्रयत्न करत आहे.यंदा 25 लाख मेट्रिक टनाचे उत्पादन करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांच्या परिस्थितीत त्यांच्या, राहणीमानाच्या दर्जात वाढ करणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here